‘नवा भारत घरात घुसून मारतो’, पाकिस्तानची तंतरली UNमध्ये मांडवा लागला मुद्दा!

निज्जर हत्याकांडाचाही उल्लेख केला New India enters the house and kills Pakistan raised the issue in the UN

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : नवा भारत धोकादायक असल्याचे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात प्रथमच मान्य केले. संयुक्त राष्ट्रांचे कायमस्वरूपी राजदूत मुनीर अक्रम यांनी पुन्हा एकदा जागतिक मंचावर भारतावर आरोप करत ‘नवा भारत तुमच्या घरात घुसतो आणि तुम्हाला मारतो’ असे म्हटले आहे.

नुकत्याच एका अमेरिकन दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला देत अक्रमने हे वक्तव्य केले असून, अक्रमने खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचाही उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, परदेशी भूमीवर राहणाऱ्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी भारत सरकार पाकिस्तानमध्ये अशाच प्रकारच्या टार्गेट किलिंगच्या घटना घडवून आणते.

2 मे रोजी झालेल्या आमसभेला संबोधित करताना अक्रम म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुरक्षा परिषद, महासचिव आणि महासभेच्या अध्यक्षांना भारताच्या पाकिस्तानमधील टार्गेट किलिंगच्या मोहिमेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, हा दहशतवाद केवळ पाकिस्तानपुरता मर्यादित नाही. कॅनडा, अमेरिका आणि शक्यतो इतर देशांमध्येही हा प्रयत्न सुरू आहे.

New India enters the house and kills Pakistan raised the issue in the UN

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात