आसामच्या मुख्यमंत्र्यांचे सावरकरवादाकडे दमदार पाऊल…!!


आसाममध्ये स्वतंत्र स्वदेशी पंथ आणि संस्कृती मंत्रालय (new independent Department of Indigenous Faith and Culture) स्थापन करून मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी सावरकरवादाकडे पहिले पाऊल टाकले आहे. ज्या धर्मपंथांची निपज हिमालयापासून सिंधू समुद्रापर्यंतच्या भरतभूमीत झाली आहे, ते सगळे हिंदुत्वाच्या कक्षेतच आहेत, ही सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या आहे. हेमंत विश्वशर्मांनी आसामपुरते नेमके हेच प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. new independent Department of Indigenous Faith and Ctva ulture of assam; hemant biswasarma steps forward towards savarakar hindutva plank


विनायक ढेरे

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पुढचा सावरकरवादी पंतप्रधान असे म्हणतात… ते खरे असलेही पण सावरकरवादाकडे प्रत्यक्ष कृतीतून पहिले पाऊल टाकले आहे ते आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी.

आसाममध्ये सरकारची सूत्रे हाती घेतल्यापासून हेमंत विश्वशर्मा यांनी धोरणात्मक निर्णयांचा धडाका लावला आहे. लोकसंख्या नियंत्रण हा विषय त्यांनी राज्याच्या टॉप अजेंड्यावर आणला आहे. त्याची चर्चा निवडक मीडियात सुरू आहे. पण त्या पेक्षाही महत्त्वाचा निर्णय हेमंत विश्वशर्मा यांनी कालच जाहीर केला आहे आणि त्याकडे मीडियाचे फारसे लक्ष गेलेले नाही, तो म्हणजे आसाममध्ये स्वतंत्र स्वदेशी पंथ आणि संस्कृती मंत्रालय (new independent Department of Indigenous Faith and Culture) स्थापन करण्याचा. हे मंत्रालय स्थापन केल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

आसाममध्ये निपजलेले धर्मपंथ आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनाचे काम हे मंत्रालय करणार आहे. आणि इथेच हेमंत विश्वशर्मांच्या सावरकरवादाची खरी मेख दडलेली आहे. Indigenous Faith and Culture हीच तर सावरकरांच्या विशाल हिंदुत्वाची परिकल्पना आणि व्याख्या आहे. या देशात निपजलेले सर्व धर्म – पंथ आणि संस्कृती हे सगळे हिंदू आहे, हा सावरकरांच्या हिंदुत्वाचा गाभा आहे. new independent Department of Indigenous Faith and Culture अर्थात स्वदेशी पंथ आणि संस्कृती मंत्रालय आसाममध्ये निपजलेले धर्मपंथ आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनाचे काम करणार आहे.



आसाममध्ये बांगलादेशातून मोठया प्रमाणावर घुसखोरी झाली आहे. त्यामुळे मूळ आसामींच्या लोकसंख्येला धक्का बसला आहे. आसाममधल्या आदिवासी, वनवासी जमाती, त्यांची संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे जतन ही राज्य सरकारची जबाबदारी आहे कारण त्यांची निपज आणि उपज मूळात आसाममधली आहे, अशी हेमंत विश्वशर्मांची धारणा आहे. हेमंत विश्वशर्मा हे मूळचे काँग्रेस संस्कृतीत वाढलेले राजकीय नेते आहेत, तरीही त्यांची ही धारणा असणे याला विशेष महत्त्व आहे.

त्याच बरोबर मेघालय, नागालँड या राज्यांशी देखील काही ठिकाणी सीमावाद आहे. या राज्यांशी आसामची चर्चा सुरू आहे. आम्ही संवादासाठी खुल्या दिलाने तयार आहोत. पण आसामच्या जमिनीवर आम्ही कोणाला अतिक्रमण करू देणार नाही, असे हेमंत विश्वशर्मा यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ आसामची समस्या ही नुसती सांस्कृतिक राहिलेली नसून त्यातला आर्थिक पैलू देखील तितकाच महत्त्वाचा ठरला आहे.

एकीकडून बांगलादेशी मुसलमान आणि दुसरीकडून नागालँडमधले मिशनरी यांचे दुहेरी अतिक्रमण आसामवर होते आहे. परिणामी आसामचे लोकसंख्या संतुलन बिघडले आहे. मूळ आसामी वंशाची लोकसंख्या या अतिक्रमण करणाऱ्यांपुढे कमी झाली आहे, याकडे हेमंत विश्वशर्मा यांनी लक्ष वेधले आहे. याचा अर्थच त्यांनी आसामच्या मूलभूत समस्येला हात घातला आहे.

सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्यापक व्याख्येत हे सगळे बसते. ज्या ज्या म्हणून धर्मपंथांची उपज आणि निपज हिमालयापासून सिंधू समुद्रापर्यंतच्या भूमीत झाली, ते सगळे हिंदुत्वाच्या कक्षेतच आहेत, ही ती व्याख्या आहे. हेमंत विश्वशर्मांनी आसामपुरते कृतीतून नेमके हेच दाखवून दिले आहे. अर्थात हेमंत विश्वशर्मांनी ही सुरूवात केली आहे. राजकीय – सामाजिक – सांस्कृतिक आणि आर्थिक पल्ला खूप लांबचा आहे. त्यात अडथळ्यांचे डोंगर असतील. जिहादी आणि मिशनरील टोळ्यांशी प्रचंड संघर्ष होईल. तो करण्याची तयारी तर हेमंत विश्वशर्मांनी दाखवून दिली आहे. या अर्थाने ते आसामचे सावरकरवादी मुख्यमंत्री आहेत.

new independent Department of Indigenous Faith and Ctva ulture of assam; hemant biswasarma steps forward towards savarakar hindutva plank

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात