
रशियाच्या लष्करी कारवाईनंतर युक्रेनमध्ये झपाट्याने बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कीवमधील भारतीय दूतावासाने एक नवीन सूचना जारी केली आहे. यामध्ये युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना घरीच राहा, शांत आणि सुरक्षित राहण्यास सांगितले आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत अनिश्चित आहे. New guidelines for Indians stranded in Ukraine, stay safe wherever you are, situation is uncertain!
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशियाच्या लष्करी कारवाईनंतर युक्रेनमध्ये झपाट्याने बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कीवमधील भारतीय दूतावासाने एक नवीन सूचना जारी केली आहे. यामध्ये युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना घरीच राहा, शांत आणि सुरक्षित राहण्यास सांगितले आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत अनिश्चित आहे.
IMPORTANT ADVISORY TO ALL INDIAN NATIONALS IN UKRAINE AS ON 24 FEBRUARY 2022.@MEAINDIA @PIB @DDNEWS pic.twitter.com/e1i1lMuZ1J
— India in Ukraine (@IndiainUkraine) February 24, 2022
भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, कीवच्या पश्चिमेकडील भागातून प्रवास करणार्यांसह कीवमध्ये प्रवास करणार्या सर्वांना तात्पुरते त्यांच्या संबंधित शहरांमध्ये परत जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दूतावासाने म्हटले आहे की नवीन अपडेट्ससाठी वेळोवेळी पुढील सल्ले जारी केले जातील. युक्रेनमधील भारतीय दूतावास सातत्याने युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना युक्रेन सोडून भारतात परतण्याचे आवाहन करत होते. युक्रेनमधील झपाट्याने बदलणारी परिस्थिती पाहता, दूतावासाने आतापर्यंत अनेक सूचना जारी केल्या आहेत.
एअर इंडियाच्या विशेष विमानांनी अनेक भारतीयांना मायदेशी आणण्यात आले, मात्र अनेक भारतीय अजूनही युक्रेनमध्येच आहेत. युक्रेनमध्ये सुमारे 20 हजार भारतीय विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येते.
New guidelines for Indians stranded in Ukraine, stay safe wherever you are, situation is uncertain!
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रतीक्षा’ बंगल्यावरून अमिताभ बच्चन यांना दिलासा, बीएमसीच्या नोटिसीवर उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, वाचा सविस्तर..
- Indian Economy : मूडीजने वाढवला भारताच्या विकासदराचा अंदाज, चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 9.5 टक्के राहण्याची शक्यता
- योगी यांच्या युपीमध्ये आदित्य ठाकरे करणार शिवसेनेच्या ३९ उमेदवारांचा प्रचार
- माणिपूरला ईशान्य भारतातील सर्वोत्तम राज्य बनवण्याचे ध्येय; अमित शाह यांचा निर्धार