वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी अनिवार्य असलेली नीट-पीजी परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी 12 मार्च रोजी होणारी राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (नीट-पीजी) पुढे ढकलण्याची मागणी एमबीबीएसच्या 6 विद्यार्थ्यांनी केली होती. यासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर आज, शुक्रवारी झालेल्या सुनावणीनंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.Neat-PG exam for medical admission postponed by 6 to 8 weeks!
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, नीट-पीजी 2022 पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचुड यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड आणि सूर्यकांत यांनी यासंबंधी सुनावणीला सुरुवात केली. यापूर्वी 7 फेब्रुवारीला सुनावणी होती. मात्र ती आधीच घेण्यात आली. यासंबंधी 25 जानेवारीला याचिका दाखल करण्यात आली होती. अखेर संबंधित परीक्षा 6 ते 8 ते आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.
– 150 विद्यार्थ्यांची संधी हुकणार
राष्ट्रीय परीक्षा मंडळाने ‘नीट पीजी 2022’ची परीक्षा 12 मार्च रोजी घेण्याचे ठरविले आहे. मात्र राज्यात सध्या पदव्युत्तर पदवर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया यंदा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि अन्य कारणांमुळे उशीरा सुरू झाली. त्यामुळे 12 मार्च रोजी नीट पीजी 2022 ची परीक्षा झाल्यास राज्यातील 150 विद्यार्थ्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. शिवाय सर्वाधिक केरळमधील 3600 विद्यार्थ्यांची इंटर्नशिप ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. गुजरातमधील 300 विद्यार्थ्यांची इंटर्नशिप जुलै महिन्यात संपणार आहे. हाच मुद्दा अन्य राज्यातील विद्यार्थ्यांचाही आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App