प्रतिनिधी
मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 3 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे. काँग्रेसची राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.NCP will contest 3 seats in Gujarat
त्यामुळे 182 पैकी 3 जागा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या आणि त्या पक्षाने मान्य केल्या आहेत. परंतु, तीनच जागा लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत मात्र 31 नेत्यांचा समावेश केला आहे. पण या यादीची चर्चा मात्र खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना वगळल्यामुळे झाली आहे.
गुजरात मध्ये पोरबंदर जिल्ह्यातील कुटियाला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार होते, त्यांचे नाव कांधल जडेजा. पण आता ते देखील राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आता ज्या तीन जागा लढवणार आहे त्यामध्ये जडेजांच्या जागेचा समावेश नाही. त्या उलट राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसने आनंद जिल्ह्यातील उमरेह, अहमदाबाद जिल्ह्यातील नरोडा आणि दाहोद जिल्ह्यातील देवगढ बरिया या जागा देऊ केल्या आणि त्या पक्षाने मान्य केल्या आहेत. सध्या या तीनही मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत.
Mission Gujrat 2022 : मोदी – भागवत आज एकाच दिवशी अहमदाबादेत; मोदींचा रोड शो आणि संघाची प्रतिनिधी सभा मात्र वेगवेगळ्या ठिकाणी…!!
मात्र तीनच जागा लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 31 नेत्यांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अर्थातच प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ जयंत पाटील यांच्यासारख्या प्रतिथयश स्टार प्रचारकांची नावे आहेत, पण त्यांच्या नावांपेक्षा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव वगळले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जास्त चर्चेत आहे. स्टार प्रचारकांची यादी तयार करणे थोडेच आपल्या हातात असते, असे सांगून अमोल कोल्हे यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App