NCERT पाठ्यपुस्तकांमध्ये “भारत” नाव आले; INDIA आघाडीच्या पोटात दुखले!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : NCERT च्या पाठ्यपुस्तकांमध्ये “इंडिया” ऐवजी “भारत” नाव आले. त्यामुळे विरोधकांच्या INDIA आघाडीच्या पोटात दुखले!!NCERT approve Bharat name, irked INDI alliance leaders

NCERT अर्थात नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग संस्थेने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये “इंडिया” ऐवजी भारत असे नामकरण स्वीकारण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये “इंडिया” ऐवजी “भारत” अशीच देशाची ओळख निर्माण होणार आहे. “इंडिया” हे इंग्रजांनी केलेले देशाचे नामकरण होते परंतु भारताची खरी सांस्कृतिक ओळख “भारत” आणि “भारत वर्ष” या नावानेच कायम राहिली. या पार्श्वभूमीवर NCERT संस्थेने हा निर्णय घेतला.



पण या एका निर्णयामुळे विरोधकांच्या INDIA आघाडीच्या नेत्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. सर्व विरोधकांनी आपल्या आघाडीचे नाव INDIA ठेवल्यानेच केंद्रातल्या मोदी सरकारने देशाचेच नामांतर करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी केला, तर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी वेगवेगळी उदाहरणे देत “इंडिया” नावाचे समर्थन केले.

आपण रिझर्व बँक ऑफ इंडिया, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस, इंडियन फॉरेन सर्व्हिस असे का म्हणतो?? आपल्या सर्वांच्या पासपोर्टवर रिपब्लिक ऑफ इंडिया असे का लिहिले आहे?? असा सवाल केला, तसेच खासदार मनोज यांनी देखील उद्या विरोधकांच्या आघाडीने INDIA हे नाव बदलून वेगळेच नाव घेतले तर सरकार देशाचे नामांतर करेल का??, असा सवाल केला, पण या सर्वातून मोदी सरकारच्या देशाच्या भारत नामकरणाची पोटदुखी विरोधकांना जडल्याचेच स्पष्ट झाले.

NCERT approve Bharat name, irked INDI alliance leaders

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात