Nayab Singh Saini : हरियाणात नायब सिंग सैनीच मुख्यमंत्री, अमित शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब; महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या आशा पल्लवीत!!

Nayab Singh Saini

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हरियाणात काँग्रेसला अनुकूल वातावरण असताना देखील भाजपने ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली काँग्रेसवर विधानसभा निवडणुकीत मात केली, त्या नायब सिंग सैनी यांच्याच गळ्यात भाजपने मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हरियाणा विधिमंडळ भाजप पक्षाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर तसेच हरियाणाचे माजी गृहमंत्री अनिल विज उपस्थित होते. सर्वांनी एकमताने नायब सिंग सैनी यांच्या नावाचा पुकारा केला. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशा पल्लवीत झाल्या.  Nayab Singh Saini as your leader again chosen

हरियाणात भाजपचा पराभव होणार काँग्रेस तिथे भाजपवर मात करणार अशी वातावरण निर्मिती माध्यमांमधून झाली होती. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या सभांना हरियाणात मोठा प्रतिसाद मिळत होता. राहुल गांधींनी जातिगत जनगणनेच्या मागणीच्या नावाखाली हरियाणात पुन्हा जाट वर्चस्वाचे राजकारण केले होते. त्यामुळे काँग्रेसला तिथे मोठा विजय मिळून त्याचे हादरे मोदी सरकारला बसतील अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात तिथे उलटे घडले.

 

भाजपने केवळ जाट समूहावर लक्ष केंद्रित न करता हरियाणातल्या छोट्या – मोठ्या जात समूहांच्या एकत्रीकरणाचा प्रयोग केला. त्यांना विविध लाभ दिले त्यांचे मेळावे घेतले. राज्यघटना बदलाचा काँग्रेसचा नॅरेटिव्ह हाणून पाडला. यातून भाजपला अशक्यप्राय वाटणाऱ्या विजय साकार करता आला. हे सगळे नायब सिंग सैनिक यांच्या नेतृत्वाखाली झाले म्हणूनच भाजपने त्यांच्याच गळ्यात पुन्हा मुख्यमंत्री पदाची माळ घातली.

त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला पाठिंबा दिला, भाजपच्या सर्व स्ट्रॅटेजी स्वीकारून बदल केले, जागावाटपात अडून बसण्यापेक्षा लवचिकता दाखविली, महायुतीमध्ये भाजपचा वरचष्मा मान्य करून त्या पक्षाला सत्तेचा जास्त वाटा दिला आणि महायुतीला महाराष्ट्रात मोठा विजय मिळवून दिला, तर भाजप पुन्हा एकनाथ शिंदेंचा नेतृत्वासाठी विचार करू शकेल, याचे संकेत हरियाणातला निकाल आणि त्यानंतर नायब सिंग सैनींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब यावरून भाजपने दिले आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Nayab Singh Saini as your leader again chosen

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात