या देवी सर्वभूतेषू कन्यारुपेण संस्थितः

निसर्ग सृजनशील असतो. त्याचं दुसरं रूप शक्ती…शक्ती म्हणजे स्त्री ..स्त्री असते अनेकरूपा… स्त्री जितकी हळवी तितकी कठीण ..जितकी नाजुक तितकी मजबूत… अवघड, कठीण प्रसंगी सर्व दुष्ट महिषासूर शक्तीचे निर्दालन करून ती बलवान ठरते. नकारात्मक शक्तींना पुरून उरते. आपली आत्मशक्ती जागृत केल्यास भल्याभल्या षड्रिपुरुपी दैत्यांचा संहार करते म्हणूनच देवीरुपात तिला बघितले जाते. तिचे कन्या रुपात पूजन केले जाते. navratri special articles 2

हा संस्कार प्रत्येक स्त्रीमध्ये जन्मजात असतो. तिची घडणावळच निसर्गाने अशी केलीय की, कोणत्याही प्रसंगी न डगमगता ती त्या परिस्थितीत स्वतःला अंतर्भूत करून घेते.

सहज जरी आजूबाजूला नजर टाकली तरी ती दिसते. कौटुंबिक नात्यात, कामाच्या ठिकाणी, शेजारीपाजारी अगदी प्रत्येकच ठिकाणी ही शक्ती आपसूकच कार्यरत असलेली दिसते.

आपल्या घरातलं जिवंत सळसळते चैतन्य म्हणजे लेक… सोनपावलांनी आलेलं नाजुक रुपडं… जणू प्रतिबिंब सुखाचं… उत्साहाने डुलणारे अंगणातील फुल.

लेक म्हणजे दोन घरांना उजळवणारी पणती. ज्ञानाचा प्रकाश देत ज्योतीने ज्योत लावत तेवणारी तेजस्वी शलाका असते… मूळातच सगळ्यांप्रति मनात ममता असलेली ही कन्या सहजपणे दुधात साखर मिसळावी तशी सासर घरी आपुलकीने रुळते, तरी माहेराची तिची ओढ मात्र तितकीच तीव्र असते कोणत्याही वयात.

भविष्यातील ही माता सौहाद्रतेने सगळ्या कुटूंबाला एकत्र जोडून ठेवते..अश्रु पुसते स्वकीयांचे… जगावेगळं नातं हे…! जे अनुभवावे …जगावे …पहावे डोळे भरून …या लेकीच्या रूपाने आई, आजी, मावशी,आत्या या साऱ्याच स्त्रिया तिच्यात आपलं बालरूप पाहून हरखून जातात …परक्याचं धन म्हणत असले तरी हे धन आपल्या उदरातून जन्म घेतल्याची जाणीव आई वडिलांसाठी फार सुखद असते. स्त्री कुठेच कमी नाही जगन्माता आहे ती, म्हणूनच तर बारसे करताना पाळण्यात घालून तिला सरस्वती, दुर्गा, अंबिका, रेणुका असे संबोधन करतात.

नवरात्रीच्या या पर्वात मुलगा – मुलगी भेद न करता या बाळजीवाला जगात येऊ द्यावे.. भ्रूणहत्या थांबलीच पाहिजे, हा जागर करू या. जो चोच देतो तो दाण्यापाण्याची व्यवस्था करतोच प्रत्येक जीवाची, हे लक्षात असू द्या!! स्त्री जग चालवणारी जननी आहे. तिच्याशिवाय सगळंच अपूर्ण !
म्हणूनच लेकीला डोळ्यासमोर आणत प्रार्थना करू या…

या देवी सर्व भुतोंषु…कन्यारूपेण संस्थित:
नमस्तयै नमस्तयै नमस्तयै नमो नमः.!!

वाचकांना मनोनमन !

navratri special articles 2

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात