गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात जोरदार वाद सुरू आहे Navneet Rana targets Asaduddin Owaisi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे. नवनीत राणा यांनी एका निवडणूक रॅलीदरम्यान सांगितले की, मी ओवेसींना आव्हान देते की, मी हैदराबादला आल्यावर मला रोखून दाखवावे. राणा पुढे म्हणाल्या की, आज देशात सर्वत्र रामभक्त फिरत आहेत. नवनीत राणा यांचे हे वक्तव्य ओवेसी यांच्या त्या विधानानंतर आले आहे, ज्यात त्यांनी आपल्या धाकट्या भावाला तोफ संबोधलं होतं.
गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांनी म्हटले होते की, ’15 मिनट के लिए पुलिस हट गई तो हम तुम्हें बता देंगे.’ त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप नेते नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवेसी यांच्या 15 मिनिटांच्या वक्तव्यावर 15 सेकंदाचा उल्लेख करत वक्तव्य केले. अवघ्या 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर ते कुठून आले आणि कुठे गेले हे कुणालाच कळणार नाही.
भाजपच्या उमेदवार नवनीत राणा म्हणाल्या होते की, छोटा म्हणतो, 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवा, आम्ही काय करू शकतो ते दाखवू. मी म्हणते, तुला १५ मिनिटे लागतील छोटे, आम्हाला फक्त १५ सेकंद लागतील. पोलिसांना 15 सेकंद हटवले तर छोट्याला आणि मोठ्यालाही कळणार नाही की ते कुठून आले आणि कुठे गेले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App