नवज्योत सिद्धू नरमले; काँग्रेसचा मुख्यमंत्री हायकमांडने ठरवेल, म्हणाले!!

वृत्तसंस्था

चंडीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून आधी काँग्रेस हायकमांडशी देखील पंगा घ्यायला तयार असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आज मात्र नरमलेले दिसले आहेत.पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली तर Navjyot Sidhu softly; Congress chief minister will decide by high command, said

मुख्यमंत्री पदाचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल आणि तो काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला आणि कार्यकर्त्यांना मान्य असेल, असे वक्तव्य नवज्योत सिंग सिद्धू यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या उपस्थितीत केले आहे.



काहीच दिवसांपूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पत्रकारांशी बोलताना, तुम्हाला कोणी सांगितले की पंजाबचा मुख्यमंत्री काँग्रेस हायकमांड ठरवते? पंजाबचा मुख्यमंत्री पंजाबची जनता ठरवेल. पंजाबी जनता ज्यांना मते देईल ते आमदार पंजाबचे मुख्यमंत्री ठरवतील. काँग्रेस हायकमांड नव्हे, असे वक्तव्य केले होते. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या या वक्तव्यातून ते काँग्रेस हायकमांडला आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

मात्र आता भूपेश बघेल यांच्या उपस्थितीत नवज्योत सिंग सिद्धू यांनी नरमाईची भूमिका घेतलेली दिसली आहे. पंजाबचा मुख्यमंत्री काँग्रेस हायकमांड ठरवेल. तो काँग्रेसच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना मान्य होईल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

Navjyot Sidhu softly; Congress chief minister will decide by high command, said

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात