वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देताच पंजाबच्या राजकारणात पुन्हा भूकंप झाला आहे. त्यांच्या राजीनाम्यावरून क्रिया – प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.Navjot Singh Sidhu resigns; Fickle – What state will an unstable person run ?; Capt. Amarinder Singh’s attack on Congress stalwarts
ते अस्थिर व चंचल व्यक्ती आहेत. पंजाब सारख्या सीमावर्ती प्रांतासाठी त्यांचे नेतृत्व योग्य नाही. हे मी आपल्याला सांगितले होते, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस श्रेष्ठींवर वार करून घेतला आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या बंडखोरीमुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांना काँग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लावले होते. हा आपला अवमान असल्याचे कॅप्टन साहेबांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री केले नाही.
काँग्रेस श्रेष्ठींनी चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्री पदावर निवड केली. त्यानंतर देखील मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी चार दिवस घोळ चालला. काल अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या दिल्ली दौऱ्याची बातमी आली. ते भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याच्या बातम्या आल्या.
Former Punjab CM Captain Amarinder Singh tweets after the resignation of Navjot Singh Sidhu as Punjab Congress President; calls him "not a stable man" pic.twitter.com/GxoP2w4wVs — ANI (@ANI) September 28, 2021
Former Punjab CM Captain Amarinder Singh tweets after the resignation of Navjot Singh Sidhu as Punjab Congress President; calls him "not a stable man" pic.twitter.com/GxoP2w4wVs
— ANI (@ANI) September 28, 2021
त्यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान अचानक नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला. ज्यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस श्रेष्ठींनी पंजाबचे मुख्यमंत्री बदलून टाकले.
त्याच नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस मधला पेचप्रसंग अधिकची चिघळल्याचे दिसून येत आहे. यातून आता काँग्रेस श्रेष्ठी कसा मार्ग काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी प्रथम पासून आपले नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी जमणार नाही, असे उघडपणे काँग्रेस श्रेष्ठींना सांगितले होते. ते कायम अस्थिर व चंचल असतात. त्यांची कार्यक्षमता नाही. त्यांचे पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांची लागेबांधे आहेत, असे त्यांनी उघडपणे काँग्रेस श्रेष्ठींना बजावले होते.
त्यांच्या मानसिक अवस्थेवर देखील कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी कठोर टिपण्णी केली होती. आज नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याच कठोर टिपण्णीचा अमरिंदर सिंग यांनी पुनरुच्चार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App