देशव्यापी ‘स्वच्छता मोहिमे’चे मोदींनी केले नेतृत्व; स्वत: कचरा उचलला, हाती झाडूही घेतला!

हरियाणाच्या अंकित बैयानपुरियासह मोदींनी स्वच्छता मोहीमेत सहभाग नोंदवला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज देशातील लाखो लोकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. देशव्यापी स्वच्छता मोहिमेसाठी पंतप्रधानांच्या आवाहनावर, सर्व स्तरातील लोकांनी, नेत्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत, रविवारी एक तासाच्या श्रमदानात भाग घेतला. Nationwide Swachta Abhiyan led by Modi Picked up the garbage himself took a broom

पीएम मोदींनी या स्वच्छता मोहिमेत हरियाणाच्या अंकित बैयानपुरियासह भाग घेतला. ज्याचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करताना मोदींनी लिहिले की, “आज जेव्हा देश स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करत आहे, तेव्हा अंकित बैनपुरिया आणि मी सुद्धा तेच केले आहे. स्वच्छतेसोबतच आम्ही फिटनेस आणि आनंदाचाही समावेश केला आहे. हे सर्व स्वच्छ आणि निरोगी भारताबाबतच आहे.”

पंतप्रधान मोदींचा आज तेलंगणा दौरा, १३ हजार ५०० कोटींचे प्रकल्प भेट देणार

या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी  अंकित बैानपुरियासह हातात झाडू घेऊन स्वच्छता करताना, स्वत: कचरा  उचलताना दिसून येत आहेत.  आज गृहमंत्री अमित शाहांपासून सर्वच केंद्रीय मंत्र्यांनी रस्त्यांवर उतरून  स्वच्छता मोहीमेत सहभाग नोंदवला आणि नागरिकांनाही स्वच्छ्तेसाठी आवाहन केले.

Nationwide Swachta Abhiyan led by Modi Picked up the garbage himself took a broom

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात