विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातमध्ये (जेएनयू) दहशतवादाविरोधात एक राष्ट्रीय सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सीमापार दहशतवाद आणि राज्य पुरस्कृत दहशतवादासह देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाºया दहशतवादाच्या सर्व पैलूंवर डॉक्टरेट स्तरावरील संशोधन होईल. यातून तयार होणारे तज्ज्ञ केवळ दहशतवादाविरोधात धोरण ठरवणार नाही, तर देशविरोधी कारवाया आणि विचारधारा डी-कोड करेल.National Security Center against Terrorism at JNU
9 फेब्रुवारी 2016 रोजी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या. जेएनयूला डाव्या विचारसरणीचा बालेकिल्ला म्हटले जाते. आता शहीद भगतसिंग मार्ग आणि सावरकर मार्ग विद्यापीठ परिसरात बांधण्यात आला आहे. स्वामी विवेकानंदांच्या मूतीर्चीही १० वर्षांपूर्वी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
देशद्रोही घोषणांमुळे कलंकित झालेली जेएनयूची प्रतिमा आता राष्ट्रीय सुरक्षा अभ्यास केंद्रामध्ये दहशतवादाच्या प्रत्येक परिमाणांवर सखोल संशोधन करून तयार केलेल्या देशभक्त तज्ज्ञांद्वारे बदलली जाईल, असे एका प्राध्यापकाने सांगितले.
विभागप्रमुख प्रा. अजय दुबे म्हणतात, ‘देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर संशोधन होण्यासाठी विशेष अभ्यास खूप महत्वाचा आहे. संशोधन केवळ डॉक्टरेट स्तरावर केले जाईल, जेणेकरून विद्वान जे काही पैलू निवडेल, ते पूर्णपणे समजून घेतल्यानंतरच, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल.
देशाच्या सुरक्षेला दहशतवादाचा सर्वात मोठा आहे. सीमापार दहशतवाद, राज्य पुरस्कृत दहशतवाद यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आता नॅरेटिव्हची लढाई शस्त्रांपेक्षा अधिक लढली जात आहे. आपल्याला वैचारिक पातळीवर दहशतवादाकडे लोकांना आकर्षित करणारे नॅरेटिव्ह देखील समजले पाहिजे.
दहशतवाद्यांकडून विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाते. त्यामुळे ते त्यांचे सहानुभूतीदार बनतात. त्याविरुध्द याठिकाणी संशोधन होईल. सीमाविरोधी दहशतवाद, जैविक शस्त्रे, सोशल मीडिया, सायबर गुन्हे, अंतर्गत सुरक्षा यासारख्या आधुनिक दहशतवादाच्या पद्धतींसह देशाविरोधात राष्ट्र निर्माण करण्याच्या प्रक्रियेच्या प्रत्येक परिमाणांवर संशोधन केले जाईल.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संगणक विज्ञान, आयटी आणि इतर तांत्रिक विभाग संशोधकाच्या सहकायार्ने दहशतवादाच्या आधुनिक शस्त्रांच्या वापरासंबंधी काम करतील, म्हणजेच तंत्रज्ञान. आण्विक जीवशास्त्र विभाग जैविक शस्त्रास्त्रांच्या संशोधकांशी सहकार्य करेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App