पंजशीर प्रांतावर ताब्यासाठी तालीबानकडून भीषण हल्ले, नॉर्दन अलायन्सकडूनही कडवा प्रतिकार


विशेष प्रतिनिधी

काबूल: अफगणिस्थानातील पंजशीर प्रांतावर ताबा मिळवण्यासाठी तालिबानने आतापर्यंतचा सर्वात मोठा भीषण हल्ला सुरू केला आहे. तालिबानच्या फौजांनी पंजशीर खोऱ्याला घेरले आहे. तालिबानकडून सातत्याने हल्ले सुरू असताना नॉर्दर्न अलायन्सकडूनही जोरदार प्रतिकार सुरू आहे.Fierce Taliban attacks on Panjshir province, bitter resistance from Northern Alliance

तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्स या दोन्ही बाजूने जीवितहानी होत आहे. पंजशीरमधील योद्ध्यांनी जारी केलेल्या व्हिडिओनुसार तालिबानकडून रॉकेट हल्ले सुरू असल्याचे दिसत आहे. अफगाणिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मागील तीन दिवसात पंजशीर खोºयावर केलेल्या हल्यात तालिबानचे मोठे नुकसान झाले आहे.



तीन दिवसात तालिबानला माघार घ्यावी लागल्यानंतर त्यांनी गुरुवारी संध्याकाळी मोठा हल्ला करण्यास सुरुवात केली. या युद्धात दोन्ही बाजूकडून विरोधकांचे मोठे नुकसान झाले असल्याचा दावा करण्यात येत आहे.

तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने स्पुटनिक या रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, आम्ही पंजशीरमध्ये मुसंडी मारली असून, ११ ठाणी ताब्यात घेतली आहेत आणि ३४ बंडखोर ठार मारले आहेत. यात दोन प्रमुख कमांडरचाही समावेश आहे. आम्ही आता पंजशीरच्या प्रमुख रस्त्यापर्यंत पोहोचलो असून, शीतल जिल्हा आम्ही ताब्यात घेतला आहे. या संघर्षात आमचे फक्त दोघे जखमी झाले आहेत.

रेझिस्टन्स फोर्सने तालिबानचा हा दावा फेटाळून लावला आहे. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आमच्या योद्ध्यांचा सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर ताबा कायम आहे. तालिबानने शोतूल मार्गे जाबुल सराजमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. आमच्या योध्यांनी तालिबानींना धक्का दिला असून त्यांची मोठी जीवितहानी झाली असल्याचा दावा रेझिस्टन्स फोर्सने केला आहे.

Fierce Taliban attacks on Panjshir province, bitter resistance from Northern Alliance

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात