एकेकाचे हिशेब चुकते करायला मी समर्थ, राजू शेट्टी यांच महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : विधानपरिषदेसाठी शिफारस करूनही नाव मागे घेतल्याने संतप्त झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर आगपाखड केली आहे. वेळा प्रत्येकाच्या येत असतात. एकाएकाचे हिशोब चुकते करायला मी समर्थ आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.I am able to settle accounts one by one, Raju Shetty’s warning to the leaders of Mahavikas Aghadi

शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली आहे. राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मदतीच्या मुद्यावर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत मोर्चे काढले. जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील आदी मंत्र्यांवर टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्या आमदारकीची शिफारस रद्द करण्याचा निर्णय घेतला.



यावर शेट्टी म्हणाले, एकतर सध्या मी या पूरग्रस्तांच्या आंदोलनामध्ये आहे. स्वाभिमानी संघटनेसाठी किंवा पक्षासाठी विधानपरिषद हे काही आमचं साध्य नाही किंवा ते नाही मिळालं तर आम्ही किंवा आमच्यातील काही दहा-वीस लोक आत्महत्या करतील असा काही नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी आमच्यात एक समझोता झाला होता

. राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेसकडे लोकसभेची एक जागा मागितली हेती. काँग्रेसने सांगलीची जागा दिली, पण राष्ट्रवादीने लोकसभेच्या जागेच्या ऐवजी समजा त्यांची सत्ता नाही आली तरी देखील, महाराष्ट्राच्या विधानसभेत जी आमदारा संख्या आहे त्यावरून, जी निवडली जाणारी विधानपरिषद आहे ती किंवा सत्ता आली तर राज्यपालांच्या कोट्यातून सरकारला जे काही १२ आमदार नेमता येतात, त्यातली एक जागा स्वाभिमानी पक्षाला द्यायचे कबुल केले होते.

खुद्द राष्ट्र्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हे कबुल केले होते. जो समझोता झाला होता त्यानुसार एक विधानपरिषद स्वाभिमानीला मिळणार आहे एवढच. मग त्यासाठी एवढी चर्चा आणि आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणून घेणार नाही. आमच्यावर कोणी मेहरबानी करत नाही किंवा कुणी आमच्यावर दया करत नाही. आम्हाला अशा दयेची गरजही नाही.

आम्ही राजकारण चळवळ मजबूत करण्यासाठी करतो. राजकारण हे एक आमचं एक साधन आहे, ते आमचं साध्य नाही आणि भविष्यात देखील असणार नाही. त्यामुळे आम्हाला त्याचा फारसा फरक पडत नाही. वेळा प्रत्येकाच्या येत असतात, ज्या त्या वेळी बघू काय करायचं ते. एकाएकाचे हिशोब चुकते करायला मी समर्थ आहे. पण सध्या मला लोकांचे प्रश्न सोडवू द्या, असेही शेट्टी म्हणाले.

I am able to settle accounts one by one, Raju Shetty’s warning to the leaders of Mahavikas Aghadi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात