विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : National Film Awards भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा ७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार केंद्र सरकारने जाहीर केले आहेत. २०२३ सालातील उत्कृष्ट चित्रपट, अभिनय, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजूंना या पुरस्कारांमधून गौरवण्यात आले आहे.National Film Awards
यंदाचे पुरस्कार विशेष ठरले कारण शाहरुख खानला त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
‘जवान’ चित्रपटातील प्रभावी भूमिकेसाठी शाहरुख खान यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. हे पारितोषिक विक्रांत मेस्सी यांच्यासोबत विभागून देण्यात आले आहे. ‘१२वी फेल’ चित्रपटातील प्रेरणादायी भूमिकेसाठी मेस्सी यांना गौरवण्यात आले. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही पटकावला आहे.
राणी मुखर्जी यांना ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ चित्रपटातील भावनिक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘द केरळा स्टोरी’ या वादग्रस्त पण प्रभावी चित्रपटासाठी सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्राप्त झाला.
प्रादेशिक भाषांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट :
भाषा चित्रपट
मराठी : श्यामची आई तमिळ : पार्किंग तेलुगू ; भगवंत केसरी मल्याळम : उल्लोझुक्कु कन्नड : कंदीलू बंगाली : डीप फ्रिज गुजराती : वश पंजाबी : गोड्डे गोड्डे चा ओडिया : पुष्कर आसामी :रंगटापू १९८२
तांत्रिक आणि कलात्मक विभागातील पुरस्कार :
दिग्दर्शन – नंदू-प्रुध्वी (हनुमान)
नृत्य दिग्दर्शन – वैशाली मर्चंट (दिंढोरा बाजे रे – रॉकी आणि राणीची प्रेमकहाणी)
गीतलेखन – कसरला श्याम (ऊरू पल्लेटूरू – बालगम)
संगीत दिग्दर्शन – जी. व्ही. प्रकाशकुमार (वाथी), हर्षवर्धन रमेश्वर (ॲनिमल)
पार्श्वगायन – शिल्पा राव (छलिया – जवान), रोहित (प्रेमीस्थुन्ना – बेबी)
संकलन – मिधुन मुरली (पुक्कालम)
छायाचित्रण – प्रसंथानू मोहापात्र (द केरळा स्टोरी)
संवादलेखन – दीपक किंगराणी (सिर्फ एक बंधा काफी है)
पटकथा – साई राजेश (बेबी), रामकुमार बालकृष्णन (पार्किंग)
ध्वनी रचना – सचिन सुधाकरन, हरिहरन (ॲनिमल)
मेकअप – श्रीकांत देसाई (सॅम बहादूर)
पोशाख रचना – सचिन, दिव्या, निधी (सॅम बहादूर)
कलादिग्दर्शन – मोहनदास (२०१८)
विशेष उल्लेख – एम. आर. राजकृष्णन (ॲनिमल – री-रेकॉर्डिंग)
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App