धर्मसंसदेतील नरसंहाराच्या विधानांमुळे गृहयुध्दाला निमंत्रण, मुस्लिम समाजाने लढण्यासाठी तयार राहण्याचे नसीरुद्दीन शाह यांचे आवाहन

हरिद्वार येथील संसदेमध्ये करण्यात आलेल्या मुस्लिमांच्या नरसंहाराच्या आवाहनामुळे हे लोक देशामधील गृहयुद्धाला निमंत्रण देत आहेत. मुस्लिमांनी अशा प्रकारच्या विधानांविरोधात लढण्यास तयार राहावे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केले आहे. Naseeruddin Shah calls on Muslim community to be ready to fight because of genocide statements in Dharmsansad


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हरिद्वार येथील संसदेमध्ये करण्यात आलेल्या मुस्लिमांच्या नरसंहाराच्या आवाहनामुळे हे लोक देशामधील गृहयुद्धाला निमंत्रण देत आहेत. मुस्लिमांनी अशा प्रकारच्या विधानांविरोधात लढण्यास तयार राहावे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केले आहे.

‘द वायर’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शाह म्हणाले, सध्या जे काही सुरू आहे ते पाहून धक्का बसतो. वादग्रस्त विधानं करणारे नक्की काय बोलत आहेत याचा त्यांना अंदाजही नसावा. ते लोक ज्या प्रकारचं आवाहन करत आहे ते एखाद्या गृहयुद्धाप्रमाणे आहे. 20 कोटी लोकसंख्येला तुम्ही अशाप्रकारे संपवण्याचं विधान करू शकत नाही. अशाप्रकारच्या विधानांविरोधात लढण्यासाठी मुस्लीम तयार आहेत.

शाह म्हणाले, आम्ही सर्वजण इथलेच आहोत. आमच्या पिढ्यानपिढ्या येथेच राहिल्यात आणि येथेच मरण पावल्यात. जे लोक अशाप्रकारची वादग्रस्त आणि भावना भडवणारी विधानं करत आहेत ते लोक नक्की काय बोलतायत त्यांचा त्यांना अंदाज नसेल. अशाप्रकारच्या विधांनाविरोधात कोणत्याही प्रकारचं आंदोलन सुरू झाले तर त्याने मोठे नुकसान होईल असे आपल्याला वाटते.



नरेंद्र मोदींच्या भारतात मुस्लिम असणं काय वाटतं? या प्रश्नावर शाह म्हणाले, मुस्लिमांना उपेक्षित ठेवले जात आहे. त्यांच्याकडे दूर्लक्ष होत आहे. त्यांना दुय्यम नागरिक बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक क्षेत्रात हे होत आहे. मुस्लिमांसाठी असुरक्षित वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला घाबरवण्याचा हा प्रयत्न आहे. मुस्लिमांमध्ये फोबिया पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू आम्ही घाबरणार नाही. मला असुरक्षित वाटत नाही कारण हे माझे घर आहे. पण माझ्या मुलांचे पुढे काय होईल याची काळजी आहे.

नरसंहार आणि वांशिक शुध्दीकरणाच्या आवाहनानंतर पंतप्रधानांच्या संपूर्ण मौनाबद्दल बोलताना नसीरुद्दीन शाह म्हणाले तुम्ही त्यांच्यावर ढोंगी असल्याचा आरोप करू शकत नाही. पण तरीही त्यांचे मौन वेदनादायी आहे. विशेष म्हणजे नरसंहाराची धमकी देणाऱ्यांना शिक्षा करणे तर दूरच पंतप्रधान ट्विटरवर त्यांना फॉलो करतात.

Naseeruddin Shah calls on Muslim community to be ready to fight because of genocide statements in Dharmsansad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात