मोदी पुढील महिन्यात सिंगापूरला भेट देणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई आणि सिंगापूरला भेट देणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले, “पंतप्रधान मोदी हे महामहिम सुलतान हसनल बोलकिया यांच्या निमंत्रणावरून 3-4 सप्टेंबर रोजी ब्रुनेईला भेट देतील.
भारतीय पंतप्रधानांची ब्रुनेईला झालेली ही पहिली द्विपक्षीय भेट असेल. आणि त्यानंतर पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान सिंगापूरला भेट देतील.
Revanth Reddy : रेवंत रेड्डींनी सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी मागितली; के. कवितांच्या जामीनाला म्हटले होते सौदा
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदी त्यांच्या सिंगापूरच्या समकक्षांच्या निमंत्रणावरून 4-5 सप्टेंबर रोजी सिंगापूरला भेट देतील. ज्या देशासोबत भारत डिजिटल, कौशल्य विकास, आरोग्यसेवा, कनेक्टिव्हिटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याच्या शक्यता शोधत आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला परराष्ट्र मंत्री (ईएएम) एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सिंगापूर येथे आयोजित दुसऱ्या भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more