
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Narendra modi जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये ग्लोबल फिनटेक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या डिजिटल यशस्वीतेवर दीर्घ भाषण केले. भारत तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये किती वेगाने प्रगती करतो आहे, याची भरपूर उदाहरणे दिली. सर्वसामान्य भारतीय तंत्रज्ञान वापरात जगात 1 नंबर वर कसा पोहोचले याचे बहारदार वर्णन केले. मात्र, सरस्वती बुद्धी वाटत होती तेव्हा हे लोक रस्त्यावर उभे होते…, या मोदींनी केलेल्या एकाच वक्तव्यावर मराठी माध्यमांनी चर्चा चालवली आहे. Narendra modi speech in Fintech Mumbai
पंतप्रधानांच्या सगळ्या भाषणाचा भर नवीन तंत्रज्ञान संशोधन, त्याचा वापर आणि सर्वसामान्य भारतीय माणूस यावर राहिला. तंत्रज्ञानातून भारताच्या प्रगतीचा वेग किती पटींनी वाढला आणि वाढणार आहे याविषयी मोदी सविस्तर बोलले, पण मराठी माध्यमांनी मात्र, “सरस्वती बुद्धी वाटत होती तेव्हा…” या एका वाक्यावर भर देतच रिपोर्टिंग केले.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Prime Minister Narendra Modi says, "You have also seen how we have brought transparency in India through digital technology. Today, direct benefit transfer is done under hundreds of government schemes. This has eliminated leakage from the system.… pic.twitter.com/wUl3wlMNrf
— ANI (@ANI) August 30, 2024
पंतप्रधान मोदी म्हणाले :
भारतात सणाचा काळ आहे. मार्केटमध्येही उत्सवाचा माहोल आहे. मी वेगवेगळी प्रदर्शन पाहून आलोय. अनेक मित्रांशी बोलून आलोय. नवीन जग दिसतय मला. मी ग्लोबल फिनटेक फेस्टीव्हलच्या आयोजकांना शुभेच्छा देतो. इथे मोठ्या संख्येने परदेशातून पाहुणे आलेत. एकवेळ परदेशी लोक भारतात यायचे, तेव्हा इथली सांस्कृतिक विविधता बघून त्यांना आश्चर्य वाटायचे, आता फिनेटकचे वैविध्य पाहून आश्चर्य चकित होतात.
एअरपोर्टपासून ते स्ट्रीट फूड, शॉपिंग पर्यंत सर्व फिनटेक क्रांती दिसतेय. मागच्या 10 वर्षात फिनटेकमध्ये 31 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे.
मागच्या 10 वर्षात फिनेटक स्टार्टअपमध्ये 500 % वाढ झाली. स्वस्त मोबाइल, स्वस्त डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन बँक खात्याने भारतात कमाल केली.
काही लोक आधी संसदेत उभं राहून विचारायचे, स्वत:ला विद्धवान मानायचे, पण सरस्वती बुद्धी वाटत होती, तेव्हा ते रस्त्यात आधीच उभे होते. ते विचारायचे, भारताता बँकांच्या शाखा नाहीत, इंटरनेट नाही, वीज नाहीय, रिचार्जिंग कुठे होणार?? फिनेटक क्रांती कशी होणार? माझ्यासारख्या चहावाल्याला विचारायचे.
आज बघा एक दशकात भारतात ब्रॉड बँड युजरची संख्या 60 मिलियन म्हणजे 6 कोटीने वाढून 94 कोटी झाली. आज कदाचितच कोणी भारतीय असेल, ज्याच्याकडे डिजिटल आयडेंटी आधारकार्ड नसेल!!
53 कोटींपेक्षा जास्त लोकांकडे जनधन बँक खाती आहेत. 10 वर्षात एकप्रकारे संपूर्ण युरोपियन युनियनची जितकी लोकसंख्या आहे, तितकी लोक आज बँकिंग सिस्टिमशी जोडली गेली आहेत. कधी लोक म्हणाये कॅश इज किंग, आज जगातील अर्धाटाइम डिजिटल व्यवहार भारतात होतात. संपूर्ण जगात भारत यूपीआय फिनटेकच सर्वात मोठ उदहारण बनलाय. आज गाव असो किंवा शहर, उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा, भारतात बँकिंग सेवा 24 तास 12 महिने चालू असते.
जनधन योजना महिला सबलीकरणाच खूप मोठं माध्यम बनली आहे. जनधन योजनेमुळे 29 कोटीपेक्षा जास्त महिलांची बँकखाती उघडली गेली. या खात्यात महिलांना बचत आणि गुंतवणूकीची नवीन संधी मिळाली. या जनधन खात्याच्या विचारावर मायक्रो फायनान्सची सर्वात मोठी मुद्रा योजना लॉन्च केली. या योजनेतून आतापर्यंत 27 ट्रिलियन पेक्षा अधिक कर्ज दिलय. या योजनेच्या 70 टक्के लाभार्थी महिला आहेत. जनधन कार्यक्रमाने महिलांसाठी आर्थिक सबलीकरणाचा पाया रचला आहे.
Narendra modi speech in Fintech Mumbai
महत्वाच्या बातम्या
- Japan : जपानमध्ये तांदळाची तीव्र टंचाई, सुपरमार्केट्स झाली रिकामी, भूकंप-वादळाच्या भीतीने घराघरांत केला जातोय साठा
- काँग्रेसच्या सर्व्हेत राष्ट्रीय पक्षांनाच मोठ्या यशाची हमी; ठाकरे – पवारांचा नुसताच बोलबाला, प्रत्यक्षात ते 60 – 60 जागांचे धनी!!
- Shivaji Maharaj Statue : शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच अभियंता चेतन पाटीलने झटकले हात!!
- Farhatullah Ghauri’s : पाकिस्तानी दहशतवादी फरहतुल्ला गौरीची भारतावर हल्ल्याची धमकी; स्लीपर सेलला गाड्या रुळावरून उतरवण्यास सांगितले