दिल्लीत लाडक्या बहिणीला ८ मार्चपासून २५०० रुपये; पंतप्रधान नरेंद्र मोदींची गेम चेंजर घोषणा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने दिल्लीकरांवर वेगवेगळ्या सवलतींचा वर्षाव केला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यात मागे राहिले नाहीत. त्यांनी दिल्लीतल्या लाडक्या बहिणींना ८ मार्चपासून 2500 रुपये मिळतील अशी घोषणा आज केली.

दिल्लीतल्या हाय प्रोफाईल आणि हाय पीच प्रचार मोहिमेची सांगता आज झाली‌. यामध्ये पंतप्रधान मोदींनी अखेरच्या दिवशी मास्टर स्ट्रोक मारला. त्यांनी दिल्लीतल्या लाडक्या बहिणींना जागतिक महिला दिनाचे गिफ्ट दिले.

यावेळी पंतप्रधान मोदींनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून देखील काँग्रेस आणि आम आदमी पार्टीला घेरले. विशेषतः त्यांनी काँग्रेसच्या सरकारांवर तिखट प्रहार केले. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधींचे सरकार असते तर त्यांनी 12 लाख रुपये मिळकतीवर किमान ४ लाख रुपये टॅक्स लावला असता आणि लोकांचे खिसे कातरले असते, असा आरोप मोदींनी केला. पण लाडक्या बहिणींसाठी 2500 रुपयांची घोषणा हे मोदींच्या आजच्या भाषणाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य ठरले ही घोषणा दिल्ली विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.

Narendra Modi Announce Rs 2500 for beloved sister in Delhi from March 8

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात