वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई टू गोवा क्रूज वर रेव्ह पार्टी झाली असताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी छापे घातल्यानंतर सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समजते आहे. इंडिया टुडे न्युजची बातमी केली आहे. याखेरीज एएनआय वृत्तसंस्थेने नुसार मूळच्या दिल्लीच्या रहिवासी असलेल्या तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची पाळेमूळे खणून काढण्याचे काम सुरू झाले आहे. नार्कोटिक्स ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे ही कायदेशीर कारवाई करत आहेत आर्यन खानला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.Narcotics Control Bureau (NCB) detained at least 10 persons during a raid conducted at a party being held on a cruise in Mumbai yesterday
ड्रग्ज भरून क्रूझ निघाली मुंबई टू गोवा, पण…
एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबई बंदरातून गोवा येथे सुटणाऱ्या क्रूजमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणण्यात आले असल्याची माहिती मिळाली होती.
मुंबई बंदरातून गोवा येथे निघालेल्या एका क्रूजवर एनसीबीने शनिवारी खोल समुद्रात छापा टाकला, तेव्हा क्रूजवर चक्क रेव्ह पार्टी सुरु असल्याचे समोर आले. या कारवाईत एनसीबीने अनेकांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये बॉलिवूडचे कलाकार बरेच असल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा जप्त केला.
#WATCH | Narcotics Control Bureau (NCB) detained at least 10 persons during a raid conducted at a party being held on a cruise in Mumbai yesterday (Visuals from outside NCB office) pic.twitter.com/yxe2zWfFmI — ANI (@ANI) October 2, 2021
#WATCH | Narcotics Control Bureau (NCB) detained at least 10 persons during a raid conducted at a party being held on a cruise in Mumbai yesterday
(Visuals from outside NCB office) pic.twitter.com/yxe2zWfFmI
— ANI (@ANI) October 2, 2021
– मुंबई ते गोवा होणार होती रेव्ह पार्टी
एनसीबीने माहितीनुसार, मुंबई बंदरातून गोवा येथे सुटणाऱ्या क्रूजमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणण्यात आले असल्याची माहिती मिळाली होती. तसेच मुंबई बंदरातून क्रूझ निघाल्यानंतर त्यामध्ये पार्टी सुरू होणार होती. एनसीबीचे मुंबई विभाग संचालक समीर वानखेडे हे आपल्या पथकासह या क्रूझवर पाळत ठेवून होते. क्रूझ मुंबई बंदरातून गोव्याच्या दिशेने निघाल्यानंतर पार्टी सुरू होताच एनसीबीच्या पथकाने भर समुद्रात असणाऱ्या क्रूजच्या एका मजल्यावर छापा टाकला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेव्हपार्टी सुरू असल्याचे आढळून आले.
एका सुपरस्टारचा मुलगाही अडकला
एनसीबीने क्रूजवर असणाऱ्या क्रू मेंबरला आपली ओळख दाखवून पार्टीत सहभागी असणाऱ्यांना ताब्यात घेऊन या पार्टीसाठी ड्रग्स पुरवठा करणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान एनसीबीने या क्रूझवरून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करून अनेकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार या रेव्ह पार्टीमध्ये बॉलिवूड कलाकार मोठ्या प्रमाणात सहभागी होते. एका सुपरस्टारचा मुलगाही अडकला आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.
पुन्हा ड्रग्स भरून मुंबईत परतणार होते!
ही क्रूझ शनिवारी मुंबई बंदरातून निघून गोवा येथे गेल्यानंतर त्या ठिकाणी क्रूझवर ड्रग्स आणि रेव्ह पार्टीसाठी लागणारे ड्रग्स घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होणार होती व सोमवारी पहाटे ही क्रूझ मुंबई बंदरात दाखल होणार होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App