Narada Sting Case : पश्चिम बंगालमध्ये सीबीआयने ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम यांच्या घरावर छापा टाकला आहे. नारदा घोटाळ्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. फिरहाद हकीम यांच्याशिवाय सीबीआयने सुब्रत मुखर्जी, तृणमूल कॉंग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर सोव्हान चटर्जी यांनाही कार्यालयात नेले. ममता सरकारला हा मोठा झटका मानला जात आहे. Narada sting case CBI Questions West Bengal ministers Firhad Hakim, Subrata Mukherjee and 2 others
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सीबीआयने ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम यांच्या घरावर छापा टाकला आहे. नारदा घोटाळ्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. फिरहाद हकीम यांच्याशिवाय सीबीआयने सुब्रत मुखर्जी, तृणमूल कॉंग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर सोव्हान चटर्जी यांनाही कार्यालयात नेले. ममता सरकारला हा मोठा झटका मानला जात आहे.
तत्पूर्वी, 9 मे रोजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी या चार टीएमसी नेत्यांविरुद्ध सीबीआयला खटला चालविण्यास परवानगी दिली होती. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षांत शारदा घोटाळा आणि नारदा घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. सीबीआयदेखील या प्रकरणांचा तपास करत आहे. या प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांची नावे समोर आली आहेत. या नेत्यांविरोधात खटला पुढे नेण्याची परवानगी राज्यपालांनी दिलेली आहे.
सीबीआयने माध्यमांना हे स्पष्ट केले की, या चारही नेत्यांना चौकशीसाठी बोलावले आहे, त्यांना अद्याप अटक केली नाही.
दुसरीकडे, पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी म्हणाले की, “सीबीआयने आम्हाला याची (अटकेची) कल्पना दिली नाही. जर त्यांनी अटक केली असेल तर ती बेकायदेशीर आहे. विधानसभा अध्यक्षांची पूर्वपरवानगी यासाठी आवश्यक आहे. पण ती घेण्यात आलेली नाही. हे लोकशाहीला धरून नाही.”
पश्चिम बंगालमध्ये 2016च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नारदा स्टिंग टेप सार्वजनिक करण्यात आले होते. 2014 मध्ये या टेप रेकॉर्ड केल्याचा दावा केला जात होता आणि टीएमसीचे मंत्री, खासदार आणि आमदारांसारख्या दिसणार्या व्यक्तींनी बनावट कंपनीच्या प्रतिनिधींकडून रोख रक्कम घेतल्याचे यात दिसले होते.
हे स्टिंग ऑपरेशन कथितरीत्या नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी केले होते. कोलकाता हायकोर्टाने मार्च 2017मध्ये स्टिंग ऑपरेशनच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. या स्टिंगमध्ये या चारही नेत्यांची नाव जाहीर झाली.
Narada sting case CBI Questions West Bengal ministers Firhad Hakim, Subrata Mukherjee and 2 others
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App