विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीतल्या यशामुळे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या बाहूंमध्ये बळ संचारल्यानंतर महाविकास आघाडीतल्या नेत्यांना महायुतीत “महाभारत”( Mahabharat ) दिसू लागले आहे, पण त्याच वेळी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आघाडीत वाद असल्याची कबुली देऊन टाकली आहे.
याची कहाणी अशी :
महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्यात आणि त्यात खेचाखेची समोर येऊ लागली आहे. महायुतीत काही जागांबद्दल खेचाखेची आहे, याची कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीमध्ये “महाभारत” सुरू असल्याची भाषा वापरली. आत्ता हे “महाभारत” छुप्या पद्धतीने सुरू आहे.96 शिवसेना आणि राष्ट्रवादी बाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर महायुतीतले “महाभारत” उघड्यावर येईल, असा दावा नानांनी केला.
पण दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपातच वाद असल्याची कबुली देऊन टाकली. महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघांमधली परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक पक्षाला आपापले बळ अजमावण्याचा अधिकार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपात वाद होईल. माध्यमांमध्ये या वादाची चर्चा देखील होईल, पण शेवटी आम्हाला एकत्रपणे काम करायचे आहे, त्यामुळे वाद झाले, तरी आम्ही चर्चा करू आणि ते वाद मिटवून पुढे जाण्याचा प्रयत्न करू, असे जयंत पाटील म्हणाले.
नाना पटोले आणि जयंत पाटील यांच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीतली विसंगती समोर आली. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना महायुतीतले “महाभारत” दिसले, तर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या डोळ्यासमोर महाविकास आघाडीतले वाद डोळ्यासमोर आले. त्यामुळे ही महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह एकत्रितपणे महायुतीला भिडण्याची तयारी करणार तरी कशी??, असा सवाल त्यामुळे तयार झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App