विशेष प्रतिनिधी
चंडीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रख्यात क्रांतिकारक शहीद भगतसिंह यांचे नाव देऊन केंद्रातील मोदी सरकारने एक महत्त्वाचे वर्तुळ पूर्ण केले आहे. “तीन क्रांतिकारक, तीन सन्मान” असेही त्याला म्हणता येईल!!
कारण कोलकात्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव नेताजी सुभाष चंद्र बोस असे आहे. अंदमान निकोबारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव वीर सावरकर असे आहे, तर आता येत्या 28 सप्टेंबरला भगतसिंह यांच्या जयंतीच्या दिवशी चंदीगड विमानतळाचे नामकरण शहीद भगतसिंह विमानतळ असे करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 25 सप्टेंबर 2022 च्या मन की बात कार्यक्रमात ही घोषणा केली आहे. Naming of Airports Three Revolutionaries Three Honours
मराठी सावरकरांविरुध्द गरळ ओकणार्यांना मराठी कॉँग्रेस जनांचेच बळ
आंतरराष्ट्रीय विमानतळांना प्रख्यात क्रांतिकारकांची नावे त्यांच्या कर्मभूमीशी संबंधित असलेल्या शहरांमध्ये देणे हा सिलसिला नेताजी सुभाष चंद्र बोस कोलकत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निमित्ताने सुरू झाला. 1995 मध्ये तत्कालीन नरसिंहराव सरकारने हे नामकरण केले होते, तर 2002 मध्ये तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारने अंदमान निकोबारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण वीर सावरकर विमानतळ असे केले. उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी त्याचे उद्घाटन केले होते. आता चंडीगड विमानतळाचे नामकरण शहीद भगतसिंह यांच्या नावाने केल्याने कोलकाता, अंदमान आणि चंडीगड ही क्रांतितीर्थे तीन महान क्रांतिकारकांच्या नावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखली जाणार आहेत.
1990 च्या दशकांपूर्वी काही विशिष्ट नावांनीच आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोठी रेल्वे स्थानके, मोठे रस्ते, स्टेडियम, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प ओळखले जात असत. त्यांचे नामकरण विशिष्ट नावांनीच साजरे होत असे. तत्कालीन सरकारांची तशी विशिष्ट भूमिका होती.
पण 1990 नंतर मात्र सरकारे बदलली. सरकारी पातळीवर मूलभूत भूमिकांमध्ये बदल झाला आणि ज्यांनी सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने देशाला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला अशा महान क्रांतिकारकांचा विविध मार्गांनी सन्मान सुरू झाला. विविध शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळांना क्रांतिकारकांची नावे देणे हा त्यातलाच एक महत्त्वाचा भाग आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नावे आधीच आंतरराष्ट्रीय विमानतळांना दिली आहेत. शहीद भगतसिंह यांचे नाव चंदीगड विमानतळाला दिल्यानंतर क्रांतितीर्थांचे एक वर्तुळ पूर्ण होत आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App