उज्जैनमध्ये मुस्लिम व्यक्तीवर ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्याची सक्ती, दोन जणांना अटक

विशेष प्रतिनिधी

उज्जैन – एका मुस्लिम व्यक्तीला ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांना दोघांना अटक केली आहे. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर त्याबाबत कारवाई करण्यात आली.
दोघे जण मुस्लीम व्यक्तीचा हात पकडून ठेवून ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्याची बळजबरी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.  Muslim pressurized for chanting jai shriram

सुरुवातीला या मुस्लीम व्यक्तीने अशा घोषणा देण्यास नकार दिला. तेव्हा अशा घोषणा देण्यात तुला काय अडचण आहे, अशी विचारणा त्या दोघांनी केल्याचेही दिसत आहे. वारंवार याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित मुस्लिम व्यक्तीने ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे.



 

“आमच्या गावात येऊन कमावतोस कसा? परवानगी घेऊन येतोस का? मग ‘जय श्री राम’ म्हणायला काय हरकत आहे? तुला ‘जय श्री राम’ म्हणावेच लागेल”, असे म्हणत त्या दोघांनी संबंधित मुस्लिम व्यक्तीचा हात पकडून ठेवला. त्यामुळे, अखेर त्या व्यक्तीने ‘जय श्री राम’ म्हणत “आता तुम्ही खूष आहात का?” अशी विचारणा केली. त्यावर, त्या दोघांनी “आता आम्ही खूष आहोत” असे म्हटल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आता या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे.

Muslim pressurized for chanting jai shriram

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात