तालीबान्यांच्या विजयाने भारतातही शाब्दिक फटाके, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्याने केला सलाम, हिंद मुस्लिमांना वाटतो गर्व


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तालिबानच्या कृत्याचा संपूर्ण जगातून निषेध होत असताना भारतातील कट्टरतावादी मात्र विजयाचे शाब्दिक फटाके उडवित आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोडार्चे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी तालिबानच्या विजयाचे स्वागत करत त्यांना सलाम केला आहे.Muslim Personal Law Board saluted the victory of the Taliban, said Muslims feel proud

एका व्हिडिओमध्ये सज्जाद नोमानी, १५ ऑगस्टची नोंद इतिहासात झाली आहे. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी शस्त्राशिवाय आणि जगातील महान शक्तीचा पराभव केला. त्यांनी काबूलमधील राष्ट्रपती भवनात ज्या प्रकारे प्रवेश केला, त्याने कोणत्याही प्रकारचा गर्व असल्याचे दाखवले नाही, असे म्हणताना दिसत आहेत.



नोमानी यांनी म्हटले आहे की, मरायला तयार असलेल्या समुदायाला जगात कोणीही हरवू शकत नाही. तुमच्यापासून दूर बसलेला एक हिंदी मुस्लिम तुम्हाला सलाम करतो. संपूर्ण जगाने पाहिले आहे की तुम्ही लोकांना मिठी मारली आहे आणि माफीची घोषणा केली आहे. संपूर्ण देशात महिलांशी कोणत्याही प्रकारची गैरवर्तन झाल्याची घटना घडली नाही. पूर्वी तुमच्यावर असे आरोप केले गेले आहेत.

यानंतर दुसऱ्याच दिवशी बाजार उघडला आणि मुली शाळेत जाताना दिसल्या. तुम्हाला दीर्घ बलिदानानंतर ही संधी मिळाली आहे. तुमचा हा भाऊ तुमच्यासाठी प्रार्थना करतो की इस्लाम हा न्यायाचा धर्म आहे. तुम्हाला जगासमोर शांततेचे उदाहरण मांडण्याची संधी मिळाली आहे.

तुम्ही दाखवून द्या की इस्लामला मानवाची सर्वांगीण प्रगती हवी आहे. मला आशा आहे की आता संपूर्ण आशियामध्ये शांतता पसरेल.नोमानी यांनी आपल्या भाषणात तालिबानचा हिंसाचार आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल कोणतेही वक्तव्य केलेलं नाही पण त्यांच्या राजवटीचे स्वागत केले आणि त्यांच्यावरील आरोपांना खोटे असल्याचे म्हटले.

Muslim Personal Law Board saluted the victory of the Taliban, said Muslims feel proud

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात