उच्च न्यायालयाच्या 2 सदस्यीय खंडपीठानेही एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. Munwar Rana’s troubles escalated, with the court refusing to stay the arrest
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असणारे देशातील प्रसिद्ध कवी मुनावर राणा यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने मुनावर राणाच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या 2 सदस्यीय खंडपीठानेही एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे.कवी मुनावर राणा यांनी महर्षी वाल्मिकींची तुलना तालिबानशी केली होती, त्यानंतर लोकांचा रोष त्यांच्यावर उफाळून आला. त्याच्याविरुद्ध हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये एससी/एसटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आंबेडकर महासभेने मुनावर राणा यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही केली होती.लखनऊ मध्ये अखिल भारतीय हिंदू महासभा आणि सामाजिक संस्कार फाउंडेशनने हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये मुनावर राणाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दिली होती.
एससी / एसटी ॲक्ट व्यतिरिक्त, त्याच्या विरोधात 153-ए, 501 (1) -बी आणि 295-ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुनावर राणा यांचे काय होते वादग्रस्त विधान ?
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जावर मुनावर राणा म्हणाले होते, ‘रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकीइतकेच तालिबानही आतंकवादी आहेत.जर वाल्मिकी रामायण लिहितो, तर तो देवता बनतो, त्यापूर्वी तो एक डाकू होता. माणसाचे चारित्र्य बदलत राहते.
मुनावर राणा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात
मुनावर राणा हे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी अलीकडेच सांगितले होते की, तालिबानसारखे काम उत्तर प्रदेशातही केले जात आहे. यूपीमध्येही काही तालिबानी असल्याचा दावा त्यांनी केला.
तेथे केवळ मुस्लिमच नाही तर हिंदू तालिबानीही आहेत. दहशतवादी फक्त मुस्लिम आहेत, हिंदूही आहेत. जसे महात्मा गांधी सरळ होते आणि नथुराम गोडसे तालिबानी होते. उत्तर प्रदेशात तालिबानसारखे काम केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App