विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून आपला छळ होत असल्याचा आरोप करणाऱ्या चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांच्या आरोपावर स्वत: मुंबई पोलीस आयुक्तांनी तपास करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. Mumbai High Court orders probe into Sanjay Raut’s case of harrasement ofSwapna Patkar
प्रसिध्द वकील आभा सिंह यांनी याबाबत स्वप्ना पाटकर यांच्या वतीने याचिका दाखल केली होती. पाटकर यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांनी वारंवार पोलीसांत तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. यावेळी न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली तपास व्हावा आणि त्याचा अहवाल न्यायालयात देण्याचे आदेश दिले. पाटकर यांचा छळ करण्याच्या हेतूनेच त्यांच्यावर बनावट डॉक्टरेट पदवी असल्याचा आरोप लावून अटक करण्यात आली. गेल्या दहा दिवसांपासून त्या तुरुंगात आहेत, असेही अॅड. आभा सिंह यांनी सांगितले. मात्र, याबाबत वेगळी याचिका करा, असे न्यायालयातर्फे सांगण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील बाळकडू या चित्रपटाच्या डॉ. स्वप्ना पाटकर निर्मात्या आहेत. ३० मार्च २०२१ रोजी त्यांनी ट्विटरद्वारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. संजय राऊत गेल्या आठ वर्षांपासून शिवसेना पक्षातील त्यांचे स्थान आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत मला धमक्या आणि शिवीगाळ करत आहेत. इतकेच नाही तर माझे कुटुंब, माझा मित्रपरिवार, नातेवाईक यांनाही ते त्रास देत आहेत. माझ्यावर काही ना काही आरोप ठेवत पोलिस स्टेशनला मला चौकशीसाठी बोलावले जात आहे. यामुळे मी खूपच त्रस्त झाले आहे, असा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला होता. दोन पानांचे पत्र लिहून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , राष्ट्रपती भवन, प्रियंका गांधी, स्मृति इराणी, निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक नेत्यांना टॅग केले होते. कुणी आपल्याला मारून टाकण्याआधी न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली होती.
स्वप्ना पाटकर यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ‘बाळकडू’ या मराठी सिनेमाची निर्मिती केली होती. स्वप्ना या प्रोफेशनली सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांची द रॉयल मराठी एंटरटेनमेंट नावाची निर्मिती संस्था असून त्याच्या त्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. याशिवाय त्यांनी २०१३ मध्ये मराठीत पुस्तकही लिहिले आहे. त्यांची निर्मिती असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बाळकडू हा मराठी चित्रपट सहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे या चित्रपटाचे सादरकर्ते खासदार संजय राऊत होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App