मुंबई-गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने पहिल्या दिवशीच केला विक्रम, नियोजित वेळेच्या अगोदर प्रवास पूर्ण

Goa Mumbai Vande Bharat Express

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखला

विशेष प्रतिनिधी

पणजी : मुंबई आणि गोव्यातील मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने आपला पहिला प्रवास नियोजित वेळेच्या जवळपास 30 मिनिटे आधी पूर्ण केला. या ट्रेनने 9.30 तासात हा प्रवास पूर्ण केला. या सेमी-हाय-स्पीड मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. Mumbai Goa Vande Bharat Express made a record on the first day completed the journey before the scheduled time

याबाबत माहिती देताना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रेनने आपला पहिला प्रवास आपल्या नियोजित वेळेच्या 24 मिनिटे आधी पूर्ण केला आहे. भारतीय रेल्वेच्या राष्ट्रीय चौकशी प्रणालीनुसार ही ट्रेन 8 मिनिटे उशीराने सकाळी 6.38 वाजता पनवेल स्थानकावर पोहोचली होती, त्यानंतर 12 मिनिटांच्या विलंबानंतर सकाळी 6.44 वाजता निघाली, ती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड स्थानकावर सकाळी 8.49 वाजता, नियोजित वेळेपेक्षा एक मिनिट उशिरा पोहोचली आणि 8.51 वाजता निघाली. ट्रेन वेळेच्या 8 मिनिटे अगोदर सकाळी 10.32 वाजता रत्नागिरी स्थानकावर पोहोचली. 2 मिनिटांच्या विलंबानंतर ती सकाळी 10.47 वाजता निघाली. गाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली स्थानकावर वेळेवर पोहोचली आणि नंतर गोव्यातील थिविमला पोहोचली.

दुसरीकडे, मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस पावसाळ्यात दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबईहून आणि मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी मडगावहून धावेल. पावसाळ्याच्या वेळापत्रकानुसार, मुंबई ते मडगाव दरम्यानचे अंतर कापण्यासाठी ट्रेनला अंदाजे 10 तास लागतील.

Mumbai Goa Vande Bharat Express made a record on the first day completed the journey before the scheduled time

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात