Mukul Roys Wife Dies : तृणमूल कॉंग्रेसचे नेते मुकुल रॉय यांच्या पत्नी कृष्णा यांचे मंगळवारी सकाळी चेन्नई येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोरोनातून बरे झाल्यानंतरही त्या आजारी होत्या. 17 जून रोजी त्यांना यकृत प्रत्यारोपणासाठी चेन्नई येथे आणण्यात आले होते. त्यांचा मुलगा सुभ्रंशू चेन्नई येथे आहे, आईचे पार्थिव घेऊन त्यांचा मुलगा कोलकात्याला पोहोचणार आहे. कांचरापारा येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहेत. mukul roys wife dies of heart attack treatment was going on in chennai
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : तृणमूल कॉंग्रेसचे नेते मुकुल रॉय यांच्या पत्नी कृष्णा यांचे मंगळवारी सकाळी चेन्नई येथील खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोरोनातून बरे झाल्यानंतरही त्या आजारी होत्या. 17 जून रोजी त्यांना यकृत प्रत्यारोपणासाठी चेन्नई येथे आणण्यात आले होते. त्यांचा मुलगा सुभ्रंशू चेन्नई येथे आहे, आईचे पार्थिव घेऊन त्यांचा मुलगा कोलकात्याला पोहोचणार आहे. कांचरापारा येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त करण्यासाठी साल्ट लेक येथील मुकुल रॉय यांच्या निवासस्थानी भेट दिली. यादरम्यान ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मुकुल हे माझे दीर्घकाळ सहकारी आहेत आणि त्यांच्या पत्नीशी वैयक्तिक ओळख होती. आम्हाला सर्वांना वाटलं की त्या ठीक होतील. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, पण अखेर त्यांचे निधन झाले. तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि डायमंड हार्बरचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीही मुकुल राय यांना भेट देऊन शोक व्यक्त केला.
राज्यपाल जगदीप धनखड यांनीही कृष्णा रॉय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जगदीप म्हणाले की, ‘मुकुल रॉय, माजी केंद्रीय मंत्री आणि आमदार, त्यांच्या पत्नी श्रीमती कृष्णा रॉय यांच्या निधनावर ईश्वराला प्रार्थना आहे की, आत्म्याला शांती मिळो. कुटुंबीय आणि अनेक मित्रांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करो. दरम्यान, पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर कृष्णनगर उत्तरचे आमदार मुकुल रॉय आणि सुभ्रंशू यांनी भाजप सोडून तृणमूलमध्ये पुनरागमन केले होते.
mukul roys wife dies of heart attack treatment was going on in chennai
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App