फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही भेट घेतली आहे.
विशेष प्रतिनिधी
पॅरिस : रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानीसह पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग बनले. नीता अंबानी यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) भारताकडून सदस्य म्हणून निवड केली. याशिवाय मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही भेट घेतली आहे.Mukesh Ambani and Nita Ambani attend Paris Olympics Opening Ceremony
मुकेश अंबानी MMRDAचे 4381 कोटींचे थकबाकीदार; आणखी 5 व्यावसायिकांनी 5818 कोटी थकवले
रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिक दरम्यान भारतातून पहिल्यांदा IOC चे सदस्य बनवण्यात आले होते. आता 8 वर्षांनंतर त्यांना पुन्हा हा सन्मान मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसाठी भारताच्या बाजूने सदस्य होण्यासाठी त्यांना सर्व 93 मतांचा पाठिंबा मिळाला.
नीता अंबानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची सदस्य म्हणून पुन्हा निवड झाल्याचा मला सन्मान वाटत आहे. थॉमस बाख आणि IOC मधील माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छिते. माझ्यासाठी हा केवळ वैयक्तिक मैलाचा दगड नाही तर क्रीडा क्षेत्रातील भारताच्या वाढत्या प्रभावाची ओळख आहे. आनंदाचा आणि अभिमानाचा हा क्षण मी प्रत्येक भारतीयासोबत शेअर करते. भारत आणि जगभरातील ऑलिम्पिक चळवळीला बळकटी देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App