वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाड याने प्रेयसी प्रिया सिंह (26) हिला मारहाण करत कारची धडक देत गंभीर जखमी केले. याप्रकरणी प्रियाने हा घटनाक्रम समाजमाध्यमांवर मांडत न्याय देण्याची मागणी केली आहे. प्रियाच्या तक्रारीनंतर अश्वजित याच्यासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घोडबंदर येथील वाघबीळ भागात प्रिया राहत असून ती सलूनचा व्यवसाय करते.MSRDC MD’s son Ashwajit Gaikwad crushed girlfriend with car; Affair with young woman for 4 years, crime against three
प्रियाने सोशल मीडियावर दिली माहिती…
अश्वजित गायकवाड याच्यासोबत गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा तिने केला आहे. 11 डिसेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता अश्वजित याने घोडबंदर येथील एका हॉटेलजवळ भेटण्यास तिला बोलावले. तिथे गेल्यानंतर दोघांत झालेल्या वादातून त्याने शिवीगाळ व मारहाण केली. तसेच डाव्या हाताला चावा घेतला. त्याचा मित्र रोमिल पाटील यानेही शिवीगाळ केली.
यानंतर अश्वजितच्या कारमध्ये ठेवलेली बॅग व मोबाइल घेत असताना कारचालक सागर शेळके याने कारने धडक दिली. यात उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खालील हाड मोडले आहे, तसेच शरीरावर दुखापत झाली आहे, असे प्रियाने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही दखल घेतली.
मार लागल्याने प्रिया जखमी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मित्र रोमिल आणि ड्रायव्हर सागरच्या सांगण्यावरून अश्वजीतने प्रियाला कारने धडक दिली. 11 डिसेंबर रोजी ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा संकुलात अश्वजीतने प्रियाला मारहाण केली. यानंतर पहाटे साडेचार वाजता त्याने प्रियाला आपल्या कारने धडक दिली आणि तिला जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेच्या तीन दिवसांनंतर, 14 डिसेंबर रोजी पोलिसांनी या प्रकरणी केवळ एफआयआर नोंदवला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
प्रिया म्हणते – अश्वजितचे वडील राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे पोलिसांनी अद्याप त्यांच्या मुलाला चौकशीसाठी बोलावले नाही. रोमिल आणि सुनील प्रिया ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारत आहेत. धमक्या येत असून एफआयआर मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
राज्य महिला आयोगाने घेतली दखल
ठाणे जिल्ह्यात तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना प्रसार माध्यमातून समोर आली आहे. पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. या वृत्ताची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App