मध्यप्रदेशात संध्याकाळी बनलेला रस्ता दुसऱ्या दिवशी गेला चोरीस, ग्रामस्थांच्या तक्रारीमुळे प्रशासन हादरले

MP Sidhi District Road complaint viral by upsarpanch of mendhara village

mendhara village : मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे उपसरपंचांनी जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. त्यांनी लिहिले की, माझ्या वॉर्ड क्रमांक-15 मध्ये एक रस्ता संध्याकाळपर्यंत बांधण्यात आला होता, पण सकाळी तो चोरीस गेला, असे उपसरपंचांनी आपल्या तक्रार पत्रात लिहिले आहे. MP Sidhi District Road complaint viral by upsarpanch of mendhara village


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे उपसरपंचांनी जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. त्यांनी लिहिले की, माझ्या वॉर्ड क्रमांक-15 मध्ये एक रस्ता संध्याकाळपर्यंत बांधण्यात आला होता, पण सकाळी तो चोरीस गेला, असे उपसरपंचांनी आपल्या तक्रार पत्रात लिहिले आहे.

तक्रार आल्यानंतर जि.प.चे सीईओ चकित झाले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सिधी जिल्ह्यातील मेंढरा ग्रामपंचायतीमधील हे प्रकरण आहे. येथे ग्रामपंचायतीने दहा लाख रुपये खर्च करून 1 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधला पण केवळ कागदावरच.

हे ग्रामस्थांना कळताच त्यांनी उपसरपंच रमेशकुमार यादव यांच्यासह मजोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलिसांत तक्रार दिली. यानुसार, संध्याकाळपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये रस्ता तयार झाला होता, परंतु तो सकाळी चोरीला गेला आहे.

दोषींवर कारवाई केली जाईल – जि.प. सीईओ

ही बाब चव्हाट्यावर येताच मोठी खळबळ उडाली आहे. माढौलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एल. प्रजापती म्हणाले की, “माझी पोस्टिंग 7 जून रोजी माढौलीमध्ये झाली आहे, ग्रामस्थांनी अर्ज केला आहे. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. हा विषय भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. उपसरपंचांच्या या तक्रार अर्जाची चर्चा संपूर्ण राज्यभरात सुरू झाली आहे.

MP Sidhi District Road complaint viral by upsarpanch of mendhara village

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात