जात प्रमाणपत्र कायम, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. अशा स्थितीत त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्यावर संकटाचे ढग दाटून आले होते. खासदार नवनीत कौर राणा यांची याचिका स्वीकारताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. नवनीत राणा यावेळी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. MP Navneet Rana big relief from the Supreme Court Caste certificate
नवनीत राणा यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. खासदाराचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द केला. नवनीत राणा यांनी आपले जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
8 जून 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते की, नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करून चांभार जात प्रमाणपत्र मिळवले होते. कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, रेकॉर्डवरून त्या शीख-चमार जातीच्या असल्याचे दिसून येते. हायकोर्टाने त्यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा हा निर्णय रद्द केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App