विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आमदार रवी राणा यांना सुडापोटी अडकवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केला आहे. किरीट सोमय्या, नितेश राणे यांच्यासोबत जे झाले तेच आमदार रवी राणा यांच्या सोबत महाराष्ट्रात होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.MP Navneet Rana alleges in Lok Sabha that state government tries to trap Ravi Rana
दिल्लीमध्ये बोलताना आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवा, असा आदेशच उद्धव ठाकरेंनी दिल्याचे सांगून राणा म्हणाले, पोलिसांच्या मदतीने दबावतंत्र महाराष्ट्र सरकारकडून वापरले जात आहे. देशात शाईफेकीच्या घटना घडल्या,
पण 307 म्हणजेच जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा माझ्यावर गुन्हा दाखल झाला, यातून नेमकं काय प्रतीत होते? संजय राऊत, अनिल परब, दिलीप वळसे, मुख्यमंत्र्यांनी सीपींना फोन लावून सांगितलं की रवी राणाला अटक करा. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर संजय राऊतांवरही 506 चा गुन्हा दाखल करा. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे, अनिल परबच्या प्रॉपर्टींवर कारवाई होईल, आणि मीही पुरावे देईन.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App