विशेष प्रतिनिधी
मुंबई : खाकी वर्दीचं कर्तव्य बजावताना आईच कर्तव्य सांभाळणाऱ्या महिला DSP च सर्वत्र कौतुक होत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्वत: याची दखल घेतली आहे . मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तोंडभरुन स्तुती केली.Mother in uniform! Deployed on DSP duty with Laker tied to his stomach! Shivraj Singh said- Madhya Pradesh is proud of itself
डीएसपी मोनिका सिंग यांच्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. त्यावेळी आपल्या दीड वर्षाच्या लेकीला घेऊन डीएसपी मॅडम मुख्यमंत्र्यांच्या सेवेला पोहोचल्या. त्यांनी बेबी कॅरिअर बॅग पोटाला बांधली होती. त्या बॅगमध्ये दीड वर्षाची लेक होती.
मातृत्वाचं आणि खाकी वर्दीचं कर्तव्य एकसाथ बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याला पाहून शिवराज मामांना राहवलं नाही. त्यांनी डीएसपी मोनिका सिंग यांच्यासह अभिमानाने फोटो काढला आणि तो ट्विटरवरती शेअर केला.
डीएसपी मोनिका सिंग यांनी दीड वर्षाच्या मुलीला कॅरिअर बॅगमध्ये ठेऊन जिथे मुख्यमंत्र्यांचं आगमन होणार आहे, त्या हेलिपॅडजवळ उभ्या होत्या. या दरम्यान, जेव्हा मुख्यमंत्री परत जाऊ लागले, तेव्हा त्यांची नजर महिला पोलीस अधिकाऱ्यावर पडली, त्यानंतर त्यांनी मोनिका सिंग यांची आपुलकीने चौकशी केली. चौकशीनंतर मोनिका आणि त्यांच्या दीड वर्षाच्या लेकीसोबत त्यांनी छानसा फोटोही काढला.
अलीराजपुर यात्रा के दौरान मैंने देखा कि डीएसपी मोनिका सिंह अपनी डेढ़ वर्ष की बेटी को बेबी कैरियर बैग में लिए ड्यूटी पर तैनात थीं। अपने कर्तव्य के प्रति उनका यह समर्पण अभिनंदनीय है। मध्यप्रदेश को आप पर गर्व है। मैं उन्हें अपनी शुभकामनाएं और लाडली बिटिया को आशीर्वाद देता हूं। pic.twitter.com/XFk7h2yxyY — Shivraj Singh Chouhan (मोदी का परिवार ) (@ChouhanShivraj) October 20, 2021
अलीराजपुर यात्रा के दौरान मैंने देखा कि डीएसपी मोनिका सिंह अपनी डेढ़ वर्ष की बेटी को बेबी कैरियर बैग में लिए ड्यूटी पर तैनात थीं।
अपने कर्तव्य के प्रति उनका यह समर्पण अभिनंदनीय है। मध्यप्रदेश को आप पर गर्व है।
मैं उन्हें अपनी शुभकामनाएं और लाडली बिटिया को आशीर्वाद देता हूं। pic.twitter.com/XFk7h2yxyY
— Shivraj Singh Chouhan (मोदी का परिवार ) (@ChouhanShivraj) October 20, 2021
शिवराज सिंह चौहान यांनी फोटो ट्विट करुन महिला अधिकाराऱ्यांची तोंडभरुन स्तुती केली. ते म्हणतात “अलीराजपूर भेटीदरम्यान, मी डीएसपी मोनिका सिंग आणि त्यांच्या दीड वर्षांच्या मुलीला पाहिलं. कर्तव्याप्रती त्यांचं समर्पण कौतुकास्पद आहे. मध्य प्रदेशला तुमचा अभिमान आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि चिमुरडीला खूप खूप आशीर्वाद देतो.
सध्या धार जिल्ह्यात नोकरीस असलेल्या मोनिका सिंग यांनी पीटीआयला सांगितले की, “मी आपल्या मुलीला घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सेवेला गेली कारण मला धारपासून 145 किमी दूर अलीराजपूरला जायचे होते. मंगळवारी सकाळी जेव्हा मी आपल्या ड्युटीसाठी यायला निघाले,
तेव्हा माझी मुलगीही झोपेतून उठली आणि सोबत येण्याचा हट्ट धरु लागली. मग मला त्यावेळी खूपच इमोशनल व्हायला झालं, मला एक आई म्हणून जबाबदारी पार पाडायची होती आणि एक पोलीस अधिकारी म्हणून माझे कर्तव्य निभवायचं होतं.”
कोण आहेत मोनिका सिंग?
ज्या महिला अधिकाऱ्याचं देशभरात कौतुक होतंय, त्यांचं नाव मोनिका सिंग असं आहे. ज्या मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून काम करतात.त्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडवर तैनात होत्या. जोबात विधानसभा जागेसाठी आगामी पोटनिवडणुकीसाठी दोन दिवसांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मंगळवारी अलीराजपूरला आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App