विशेष प्रतिनिधी
भोपाळ : शेजाऱ्यांची जिरवण्यासाठी सासू आणि जावयाने मिळून सामुहिक बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा डाव आखला. परंतु, विज्ञानाने काम केले आणि डीएनए रिपोर्टमध्ये बलात्कार इतरांनी केला नसून सासूने जावयाबरोबर शरीरसंबंध ठेवल्याचे उघड झाले. खोट्या तक्रारीमुळे दोघांनाही दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.Mother-in-law complains of gang-rape to seduce neighbors, but DNA testing reveals immoral relationship with son-in-law
या दोघांनी २०१४ साली खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्याच्या आधारे पोलिसांनी त्यावेळी चार लोकांना अटक केली होती. पोलीसांत तक्रार दाखल झाल्यावर नियमाप्रमाणे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी बलात्कार झाला असण्याची शक्यता आहे, असे वैद्यकीय अहवालांत म्हटले होते.
त्यावेळी फिर्यादी महिला आणि तिच्यासोबत असलेल्या जावयाचे कपडे व स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, स्वॅबच्या नमुन्यातील डीएनए हे एकाही आरोपीच्या डीएनएशी जुळले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या महिलेच्या जावयाची चौकशी केली. त्याच्या डीएनएचे नमुने मात्र जुळल्याने पोलिसांनी अधिक सखोल तपास केला.
त्यावेळी आपले सासूबरोबर शारीरिक संबंध असल्याची कबुली जावयाने दिली.पाण्याचा नवीन हातपंप बसविण्यावरून झालेल्या वादामुळे आपल्या शेजारी राहणाऱ्या चार लोकांना अद्दल घडविण्याचे सासू व जावयाने ठरविले. त्या चौघांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याची खोटी तक्रार या महिलेने पोलिसांकडे केली.
हे सारे प्रकरण उजेडात आल्यानंतर या दोघांना अटक केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. बलात्काराची खोटी तक्रार करण्याची प्रकरणे कमी असली तरी अशा घटनांतील आरोपींना कडक शिक्षा दिल्यास इतरांनाही जरब बसेल, असे सत्र न्यायालयाने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App