मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा दोन दिवस आधीच झाल्याचे हवामान खात्याने सांगितले
विशेष प्रतिनिधी
देशात मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्यानुसार मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून तेथे मुसळधार पाऊस पडत आहे. मान्सूनच्या आगमनाने अनेक राज्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.Monsoon entered the country Rains begin in Kerala
दरम्यान, मान्सूनची एन्ट्री अपेक्षेपेक्षा दोन दिवस आधीच झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. आज म्हणजेच 30 मे रोजी ईशान्य भारतातील बहुतांश भागात मान्सून पुढे सरकला आहे.
केरळमधील कोट्टायम जिल्ह्याच्या अनेक भागात मान्सूनच्या पहिल्या पावसाची नोंद झाली आहे. IMD नुसार, नैऋत्य मान्सून केरळला धडकला आहे आणि आज 30 मे रोजी ईशान्य भारताच्या बहुतांश भागात पोहोचला आहे. हवामान खात्याच्या (IMD Monsoon Update) नुसार, यावेळी दक्षिण-पश्चिम मान्सूनचा अंदाज 1 जूनच्या दोन दिवस आधी आला आहे. मान्सून काही तासांतच ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पोहोचेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App