मोदींनी 15 दिवसांच्या प्रचाराच्या भाषणांमध्ये “मोदी”, “हिंदू – मुस्लिम”, “मंदिर” किती वेळा शब्द वापरले??, ते काँग्रेस अध्यक्षांनी मोजले!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज अखेर संपला. तब्बल 7 टप्प्यांमध्ये चाललेल्या या प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 180 जाहीर सभांमध्ये भाषणे केली. 80 मुलाखती दिल्या. 60 पेक्षा जास्त संमेलने केली.Modi use the words “Modi”, “Hindu – Muslim”, “Temple” in his 15 days of campaign speeches??, counted by Congress president!!

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी नेमके किती प्रचार सभांमध्ये भाषणे केली??, किती मुलाखती दिल्या?? याचा आकडा काँग्रेसने अद्याप जाहीर केलेला नाही.



परंतु काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 15 दिवसांच्या प्रचारांच्या भाषणामध्ये कोणते शब्द नेमके किती वेळा वापरले??, याची आकडेवारीच आज सादर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराचा स्तर खालावला. त्यांनी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केली. त्यांनी हेट स्पीच केली, वगैरे नेहमीचे आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेच, पण या आरोपांच्या पुष्ट्यर्थ खर्गे यांनी मोदींनी नेमके कोणते शब्द किती वेळा वापरले??, याची जंत्री दिली.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मोजणीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील शब्द “इतक्या” वेळा वापरले :

मोदी 758, मंदिर 421, मुस्लिम – पाकिस्तान – मायनॉरिटीज 224, इंडी गठबंधन 573, काँग्रेस 232!! पण मोदींनी आपल्या भाषणामध्ये एकदाही बेरोजगारी, महागाई हे शब्द उच्चारले नाहीत. असा आरोप खर्गे यांनी केला.

स्वामी विवेकानंदांच्या खडकावर बसून किंवा गंगेत – समुद्रात डुबकी मारून महात्मा गांधी समजणार नाहीत. त्यासाठी महात्मा गांधींचा अभ्यास करावा लागेल, असा टोमणा मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींना हाणला.

देशात इंडी आघाडीला बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी केला, पण काँग्रेसला लोकसभेच्या किती जागा मिळतील?? त्यानंतर नेतेपदी कोण असेल??, पंतप्रधान कोण होईल??, या प्रश्नांची उत्तरे मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली नाहीत.

Modi use the words “Modi”, “Hindu – Muslim”, “Temple” in his 15 days of campaign speeches??, counted by Congress president!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात