जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी होणार आहे.मुंबई विमानतळावर रविवारी संध्याकाळी ईडीने जॅकलीनला थांबवले होते.Money laundering case: Jacqueline Fernandez to be questioned on December 8; Will Bollywood’s brother Salman Khan help?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर आली आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी होणार आहे.मुंबई विमानतळावर रविवारी संध्याकाळी ईडीने जॅकलीनला थांबवले होते.
आता ८ डिसेंबर रोजी दिल्लीत हजर राहण्याचे ईडीने तिला समन्स बजावले आहे. दरम्यान आता अडचणीत सापडलेल्या जॅकलिनच्या मदतीसाठी आता बॉलिवूडचा भाई सलमान खान मदत करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण ५ जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. त्यामध्ये अरबी घोड्याची किंमत तब्बल ५२ लाख आणि प्रत्येकी ९ लाख रुपये किंमत असलेली एकूण ३६ लाखांच्या ४ पर्शियन मांजरांचाही समावेश आहे.या प्रकरणासंदर्भात जॅकलिनला देशाबाहेर जाण्याची परवानगीही देण्यात आली नाही. येत्या काही दिवसांत ईडी जॅकलिनच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App