लक्षद्वीपच्या समुद्र किनाऱ्यावर मोदींचा सैर सपाटा; चिनी मांडीवर जाऊन बसलेल्या मालदीवच्या पर्यटनाला “फटका”!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लक्षद्वीपमधील समुद्रकिनाऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सैर सपाटा करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. देशात राममंदिर, काँग्रेसचे ट्रक चालक संपाचे टूलकिट आणि दारात येऊन ठेपलेली लोकसभा निवडणूक हे सगळे घडत असताना पंतप्रधान मोदी सुट्टीसाठी का गेले असतील??, असा सवाल अनेकजण सोशल मीडियावर विचारत आहेत. काँग्रेस मोदीजींची खिल्ली उडवेल आणि सर्व प्रकारचे मिम्स तयार करून आणि इतर वाद निर्माण करेल, अशी शक्यता भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते आहे. Modi’s walk on the beach of Lakshadweep

पण पंतप्रधान मोदी तर कधीच सुट्टीवर नसतात. मोदीजींनी नेमके काय केले आहे??, तर लक्षद्वीप समुद्राच्या किनाऱ्याचा सैर सपाटा करून त्यांनी लक्षद्वीपला भारतीयांसाठी उत्तम डेस्टिनेशन म्हणून समोर ठेवले आहे. मालदीवमध्ये भारतविरोधी सरकार असताना आणि त्या सरकारने चीनच्या मांडीवर जाऊन बसण्याचा निर्णय घेतलेल्या सरकारला फटका दिला आहे. मालदीव प्रेमींसाठी लक्षद्वीपला एक व्यवहार्य पर्यटनाचा पर्याय म्हणून समोर ठेवले आहे. लक्षद्वीपचे पर्यटन वाढेल. त्यामुळे मालदीवच्या पर्यटनाला मोठा बसेल.


मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या कमी झाल्यास त्याचा आर्थिक फटका मालदीवला बसून मालदीवच्या सरकारला “सरळ” व्हावे लागेल.

मोदींचा कुठलाच सैरसपाटा अथवा फेरफटका एवढा सरळ आणि सोपा नसतो. जो भारताला त्रास देतो, भारतविरोधी भूमिका घेऊन भारतविरोधी कारवाया करतो, त्या कारवायांना चिथावणी देतो, त्यांना मोदींच्या सैर सपाट्याचे आणि फेरफटक्यांचे असे काही “फटके” बसतात, की भल्याभल्यांना “सरळ” व्हावे लागते. मालदीवच्या चीनप्रेमी सरकारला याचा लवकरच अनुभव येण्याची दाट शक्यता आहे.

Modi’s walk on the beach of Lakshadweep

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात