प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. कोरोना काळातली वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातून बिहारी आणि उत्तर प्रदेशातल्या जनतेला काँग्रेसच्या नेत्यांनी तिकीटे काढून देऊन बिहार उत्तर प्रदेश मध्ये पाठवले पाठवले. त्यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला, असा आरोप मोदींनी केला होता. Modi’s speech should not be disturbed, there was nothing anti-Maharashtra in it; MP Navneet Rana’s Supriya Sule tola
या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले होते. महाराष्ट्राला कोरोनाचा सुपर स्प्रेडर म्हणणे हा महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान आहे. भाजपच्या आमदारांनी, खासदारांनी देखील त्या विरोधात उठून उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून ही अपेक्षा नव्हती. ते फक्त भाजपचे नव्हे तर देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र याचा त्यांना विसर पडलेला दिसतो, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती.
नवनीत राणा यांचे टीकास्त्र
याच मुद्द्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात महाराष्ट्राच्या विरोधात काहीही नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राविषयी आदर नसता तर पालखी महामार्ग, समृद्धी महामार्ग एवढी विशाल कामे झाली नसती, असा टोला नवनीत राणा यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांच्या कड्या कमजोर झाल्या आहेत. महाविकास आघाडी कधीही तुटेल त्याकडे सुप्रिया सुळे यांनी अधिक लक्ष द्यावे. उगाच मोदींच्या भाषणामुळे आपण हैराण झाल्याचे दाखवू नये असा खोचक सल्लाही नवनीत राणा यांनी त्यांना दिला.
राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला
सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टोला लगावला आहे. आज सुप्रिया सुळे या पंतप्रधान मोदींवर टीका करताहेत. पण राजीव गांधींनी ज्यांना काँग्रेस मध्ये घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले, त्यांनीच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून नवा पक्ष काढला, हे सुप्रिया सुळे विसरल्या का?, असा खोचक सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री झाल्याच्या मुद्द्यावर त्यांनी बोलले पाहिजे, असेही ट्विट विखे पाटील यांनी केले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. शरद पवारांच्या राजकारणाबाबत नेहमी “पाठीत खंजीर खुपसणे” या वाक्प्रचाराचा वापर करण्यात येतो. आधी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसला, असा आरोप अनेकांनी केलाच होता. आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट मध्ये राजीव गांधी यांचे नाव घेऊन पवारांच्या राजकारणाच्या जुन्या जखमेवरील खपली काढल्याचे मानण्यात येत आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया ?सुळे
खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याने मनस्वी दु:ख झाल्याचे सांगितले. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही. हा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही, तर हा राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राज्यातील भाजप आमदार, खासदारांनी याविरोधात उभे राहिले पाहिजे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
लोकशाहीत टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे. तो लोकशाहीने आपल्याला दिला आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा होती की राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना देशाला दिशा देणारे विचार मांडतील परंतु त्यांनी जे वक्तव्य केले त्याने राज्याचा अपमान झाला आहे. पंतप्रधान म्हणून निवडून आल्यावर ते देशाचे पंतप्रधान असतात ते कुठल्या पक्षाचे नसतात याचा विसर त्यांना पडलेला दिसतो अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.
पंतप्रधानांनी राज्यांना दिशा द्यावी. राज्ये अडचणीत आहेत. कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. चीनने नवा प्रश्न निर्माण केला आहे. नोकर्यांचा प्रश्न आहे. यावर काही बोलतील या अपेक्षेने देश बघत होता. दुर्दैव असे की ते महाराष्ट्राबद्दल बोलले. महाराष्ट्राने भाजपचे १८ खासदार निवडून दिले. तुम्ही पंतप्रधान आहात, त्यात सिंहाचा वाटा महाराष्ट्रातील मतदारांचा आहे. त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केला हे धक्कादायक असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
भाजपचे पंतप्रधान नाही, तर तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. पंतप्रधान हे पद पक्षाचे नाही ते संविधानाने दिलेले पद आहे याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन दिली. राजकारणाची पातळी इतकी घसरली आहे की आपण माणुसकीही विसरणार आहोत. कोण कुणामुळे कोरोना स्प्रेडर होते हे आत्मपरीक्षण करावे हे नवाब मलिक बोलले ते बरोबर होते असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more