विशेष प्रतिनिधी
अयोध्या : आपल्या अयोध्या धाम दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ 16 किलोमीटरचा भव्य दिव्य रोड शो च केला असे नाही, तर त्यांनी महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटनही केले. Modi’s Grand Roadshow in Ayodhya
त्याचवेळी भगवान श्रीरामांच्या अतिशय जवळ असणाऱ्या निषाद समुदायाशी त्यांनी संवाद साधला. त्यांना श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. त्यानंतर मोदींनी देशातल्या उज्ज्वला योजनेच्या दहाव्या कोटीची लाभार्थी ठरलेल्या महिलेच्या घरी जाऊन चहापान केले. 16000 कोटींच्या विकास कामांचे कमांचा शुभारंभ मोदींनी केलाच, पण त्याचबरोबर आपण जनतेशी कसे जोडले गेलो आहोत, याचेही प्रत्यंतर जनतेला दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळ ते अयोध्या रेल्वे स्थानकापर्यंत मेगा रोड शो केला. या मेगा रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केलं. तसेच नव्या ट्रेनला हिरवा कंदील दाखवून जनतेला मोठे गिफ्ट दिले.
मेगा रोड शो, हजारो नागरिक…
अयोध्या विमानतळ ते अयोध्या रेल्वे स्थानकापर्यंत हा रोड शो सुरू होता. हजारो लोक या रोड शोमध्ये सामील झाले होते. मोदींवर फुलांची उधळण होत होती. मोदी मोदीचा जयघोष आसमंतात घुमत होता. जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला होता. हजारो हात उंचावत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या उंचावलेल्या हाताना हात उंचावून अभिवादन करत होते. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येच्या रस्त्या रस्त्यावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शस्त्रधारी सैनिकही प्रत्येकावर करडी नजर ठेवून होता.
https://www.youtube.com/watch?v=fTOdbNysBmA
फुलांची उधळण आणि…
फुलांची उधळण आणि नागरिकांचं अभिवादन स्वीकारतच मोदींचा ताफा अयोध्या धाम रेल्वे स्थानकात आला. यावेळी मोदी यांच्या हस्ते अयोध्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर मोदी यांनी सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत या दोन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते.
रोड शो मध्ये पंतप्रधान मोदींनी लता मंगेशकर चौकात आपल्यातल्या गाडीतून उतरून चौकाची पाहणी केली तिथे हजर असलेल्या हजारो लोकांना हात उंचावून अभिवादन केले आणि त्यानंतर त्यांचा ताफा महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे रवाना झाला.
16 हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा
त्यानंतर मोदी यांनी एकट्या अयोध्येसाठी 16 हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा केली. यावेळी मोदी यांच्या हस्ते चार पुनर्विकसित रस्त्यांचं उद्घाटन केलं. रामपथ, भक्तीपथ, धर्मपथ आणि श्री राम जन्मभूमी पथाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
एकूण 40 स्टेज
पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शोनंतर जनसभेला केले. सभा स्थळी देशभरातील कलाकारांनी त्यांचे स्वागत केले. एअरपोर्ट पासून रेल्वे स्थानक आणि राम पथ मार्गापर्यंत एकूण 40 स्टेज उभारण्यात आली होती. या ठिकाणी देशभरातील 1400 हून अधिक कलाकार लोक कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App