मोदी संसदेत दिसणार नाहीत, तर फक्त अयोध्या – काशीतच दिसतील; चिदंबरम यांची शेरेबाजी!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या संसदेविषयी एवढी “आस्था” आहे, की ते संसदेत कधीच तुम्हाला दिसणार नाहीत. तुम्हाला ते फक्त आयोध्या – काशीमध्येच दिसतील, अशी शेरेबाजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे.Modi will not be seen in Parliament, only in Ayodhya-Kashi; Chidambaram’s slandert

चिदंबरम हे आज राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधकांच्या मोर्चामध्ये सामील झाले होते. राज्यसभेतील 12 खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेतील महात्मा गांधी यांचा पुतळा ते विजय चौक असा मोर्चा काढला होता.



पण त्यामध्ये तृणमूळ काँग्रेस, वायएसआर काँग्रेस आदी पक्ष सहभागी झाले नव्हते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना चिदंबरम यांनी वरील टिप्पणी केली आहे.चिदंबरम म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकशाहीविषयी आस्था नाही.

देशाच्या संसदेविषयी तर त्यांना “एवढे प्रेम” आहे की ते कधी तुम्हाला संसदेत दिसणारच नाहीत. ते फक्त आयोध्या – काशीमध्येच तुम्हाला दिसू शकतील. संसदेत चर्चेशिवाय एकापाठोपाठ एक विधेयके संमत होत आहेत. हे लोकशाहीचे जिवंत असल्याचे लक्षण नाही.

पण मोदींना त्या लोकशाहीशी काही देणेघेणे नाही, असा आरोपही चिदंबरम यांनी केला आहे. जयपूरच्या रॅलीत राहुल गांधींनी हिंदू आणि हिंदूत्व यातला भेद असल्याचा दावा केला, तर आता चिदंबरम यांनी राहुल गांधी यांच्या पुढे जाऊन पंतप्रधानांवर थेट ते फक्त आयोध्या आणि काशी मध्येच सापडतील असा आरोप केला आहे.

Modi will not be seen in Parliament, only in Ayodhya-Kashi; Chidambaram’s slandert

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात