मोदींनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन; जाणून घ्या, मोदींनी देवाकडे काय मागितले!

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत

विशेष प्रतिनिधी

तिरुपती : पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी रात्री उशीरा आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे पोहोचले. जिथे राज्याचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यासह अनेकांनी त्यांचे स्वागत केले.Modi visited Tirupati Balaji Know what Modi Prayed God

पंतप्रधानांनी तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली. मोदींनी ट्विट करून तिरूमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात १४० कोटी भारतीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.



यानंतर मोदी तेलंगणाला रवाना होतील. येथे ते निवडणूक सभेला उपस्थित राहून जनतेला संबोधित करणार आहेत. दुपारी 12 वाजता महबूबाबाद आणि दुपारी 2 वाजता करीमनगर येथे पंतप्रधान जाहीर सभांना संबोधित करतील.

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री जगनमोहन यांच्या आगमनानिमित्त तिरुमलाच्या मार्गावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. रेनिगुंटा विमानतळ ते तिरुमला टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही कडक नजर ठेवण्यात येत असून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे.

Modi visited Tirupati Balaji Know what Modi Prayed God

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात