पूर्णेश मोदी हे मोदी समाजातले नाहीत, मी माफी मागायचा प्रश्नच नाही, मी दोषीही नाही!!; राहुल गांधींचे सुप्रीम कोर्टात उत्तर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मोदी आडनाव टिपण्णी बदनामी प्रकरणात बदनामीचा खटला दाखल करणारे पूर्णेश मोदी हे मूळात मोदी समाजातले नाहीत. त्यामुळे मी त्यांची माफी मागायचा प्रश्नच उद्भवत नाही. मी दोषीही नाही. त्यामुळे मला देण्यात आलेली शिक्षा रद्द करावी, असे उत्तर राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात दिले आहे. या प्रकरणावर आता 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. Modi surname remark defamation case

माझ्यावर लाभलेल्या गुन्ह्यासाठी मी दोषी नाही आणि त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा टिकवता येणार नाही, असे असे उत्तर राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयात दिले होते तेच त्यांनी सुप्रीम कोर्टात आहे त्यांनी कायम ठेवले आहे. जर माफीच मागायची असती तर ती आधीच मागून मोकळा झाला असतो, असेही राहुल गांधींनी या उत्तरात नमूद केले आहे.

तक्रारकर्ते, गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश ईश्वरभाई मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर दिलेल्या उत्तरात राहुल गांधींचे वर्णन करण्यासाठी अहंकारी अशा निंदनीय शब्दांचा वापर केला. कारण मी माफी मागण्यास नकार दिला. पण मूळात पूर्णेश मोदी हे मोदी समाजातले नाहीत त्यामुळे मी माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे राहुल गांधींनी उत्तरात नमूद केले आहे.

लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत गुन्हेगारी प्रक्रिया आणि परिणामांचा वापर करून राहुल गांधींना कोणतीही चूक न करता माफी मागण्यासाठी दबाव आणणे, त्यांची खासदारकी रद्द करणे हा न्यायिक प्रक्रियेचा घोर दुरुपयोग आहे आणि या सुप्रीम कोर्टाने आधीच्या न्यायालयाचा निकाल कायम करू नये, असे राहुल गांधींच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात दिलेल्या अर्जात नमूद केले आहे.

Modi surname remark defamation case

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात