नितीन देसाई यांच्या आत्महत्याचं एक कारण समोर, ND स्टुडिओ वर होती जप्तीची तलवार


जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण होते प्रलंबित


विशेष प्रतिनिधी

पुणे : बॉलीवूडचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या च्या बातमीने संपूर्ण बॉलीवूड आणि मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला. Art director nirund Desai suicide case.

नितीन देसाई यांचे राजकीय वर्तुळातही मोठे संबंध असल्याने राजकीय वर्तुळातून पण या आत्महत्या बद्दल शोक आणि हळहळ व्यक्त होत आहे. एनडी स्टुडिओ सारखा भव्य दिव्य साम्राज्य निर्माण करणारा कलादिग्दर्शक, नितीन देसाई हा मराठी माणसासाठी कायमच आदर्श आणि अभिमानानं मिरवा व असं नाव होतं.



मात्र त्यांच्या अचानक अशा या जाण्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. नितीन देसाई यांच्या आत्महत्येचा नेमकं कारण काय याचा पोलीस तपास सुरूच आहे मात्र. या आत्महत्या मागे आर्थिक कारण असल्यासही बोलला जात आहे.

देसाई यांनी त्यांच्या कर्जत- चौकफाटा येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. आज सकाळी कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली.आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप उघड झालेले नाही;

मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांच्या एनडी स्टुडियोवर जप्तीची टांगती तलवार होती. अशी शक्यता वर्तवली जाक आहे. मुंबईतील एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने मालमत्ता जप्त करण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. हे प्रकरण रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन महिने प्रलंबित होते.
देसाई यांच्या आत्महत्ये विषयी अधिक माहिती देताना आज सकाळी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, देसाई यांचा मृतदेह दोरीला लटकताना ND स्टुडीओ मध्ये मिळुन आला आहे. या घटनेत आम्ही सर्व बाबी तपासुन पाहत आहोत.

Art director nirund Desai suicide case.

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात