विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ज्या मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेस सह सर्व विरोधकांनी देशभरात जंग जंग पछाडले. मोदी सरकारला संसदेत आणि संसदेबाहेर घेरले, त्या मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेरीस लोकसभेत बोलले. त्यांनी काँग्रेसचे पुरते वाभाडे काढले, पण ते ऐकायला काँग्रेस सह कोणतेही विरोधक सदनात थांबू नाही शकले, अशी स्थिती आज लोकसभेत अविश्वास ठरावाच्या मोदींच्या भाषणाच्या वेळी दिसून आली.Modi spoke on manipur in loksabha, but opposition couldn’t digest his truthful speech
पंतप्रधानांचे भाषण अर्ध्यावर आले, तोच सर्व विरोधकांनी सभात्याग केला आणि ते निघून गेले. त्यामुळे अविश्वास ठरावावर कोणतेही मतदान न होताच लोकसभेचे कामकाज स्थगित करावे लागले.
पण त्यापूर्वी लोकसभेत बेशिस्त वर्तन केल्याबद्दल पंतप्रधानांच्या आणि अन्य मंत्र्यांच्या भाषणामध्ये वारंवार अडथळे आणल्याबद्दल काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेने बहुमताने निलंबित केले.
अविश्वास ठरावावर मतदान टाळले
पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर मध्ये गेले नाहीत. मणिपूर विषयी ते बोलायला तयार नाहीत, असा आरोप काँग्रेसने संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्याने केला होता. त्यासाठीच त्यांनी मोदी सरकार विरुद्ध लोकसभेत अविश्वास ठराव मांडला. पण पंतप्रधान मोदी प्रत्यक्षात लोकसभेत जेव्हा मणिपूर हिंसाचारावर बोलायला लागले, त्यावेळी मात्र काँग्रेससह सर्व विरोधकांनी त्यांचे उत्तर ऐकणे ऐवजी सभात्याग करणे पसंत केले आणि सगळे विरोधक लोकसभेतून निघून गेले. अविश्वास ठरावावर मतदान घेण्याची देखील विरोधकांनी मागणी केली नाही. त्यामुळे लोकसभेचे कामकाज मतदानाशिवायच तहकूब करावे लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या घटनेवर भाष्य करावं या हेतूसाठी विरोधकांनी लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव सादर केला होता. गेल्या तीन दिवसांपासून या अविश्वासाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत चर्चेला उत्तर दिले.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीचे दोन तासात विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी विरोधकांची अक्षरश: खिल्ली उडवली. त्यानंतर मोदी मणिपूरच्या संवेदनशील विषयावर बोलू लागले. पण त्यावेळी विरोधक साधनात थांबले नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले
“हा देश विरोधी पक्षाकडून जास्त अपेक्षा करु शकत नाही. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मणिपूरच्या घटनेच्या चर्चेवर सहमती दर्शवली असती तर फक्त मणिपूर विषयावर विस्ताराने चर्चा होऊ शकली असती. मणिपूरच्या घटनेशी संबंधित प्रत्येक पैलूवर चर्चा होऊ शकली असती. त्यांनाही बरंच काही बोलण्याची संधी मिळू शकली असती. पण त्यांना चर्चेत रस नव्हता. विरोधकांना फक्त गदारोळ करायचा होता.
अमित शाह यांनी काल विस्ताराने या घटनेची माहिती दिली तेव्हा देशाला सुद्धा आश्चर्य वाटले की, या लोकांनी इतक्या अफवा पसरवल्या आहेत. अशी पापं या लोकांनी केली आहेत. त्यांनी आज अविश्वासाचा प्रस्ताव आणला, अविश्वासाच्या प्रस्तावावर ते बोलले तर त्यांचं दायित्व आहे की, देशाच्या विश्वासाला प्रकट करा.
आम्ही सांगितलं होतं की, मणिपूरच्या घटनेवर चर्चेसाठी या. गृहमंत्र्यांनी चिठ्ठी लिहून म्हटलं होतं. त्यांच्या विभागाशी संबंधित विषय आहे. पण विरोधकांकडे हिंमत आणि इच्छा नव्हती. पोटात पाप होतं. त्यांच्या पोटात दुखत होतं आणि डोकं फोडत होते.
मणिपूरच्या स्थितीवर अमित शाह यांनी काल दोन तास संयमाने माहिती दिली. देशाच्या चिंता व्यक्त केली. देशाच्या जनतेला जागृत करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मणिपूरला विश्वास देण्याचा प्रयत्न होता. मणिपूरच्या समस्येसाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न होता. पण विरोधकांनी फक्त राजकारण केले.
मणिपूरमध्ये कोर्टाचा एक निर्णय आला. कोर्टात काय होतंय ते आपण जाणतो. कोर्टाच्या निर्णयानंतर दोन मतप्रवाह बनले. त्यानंतर हिंसेच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक परिवारांचं नुकसान झालं. अनेकांनी आपल्या जवळच्यांना गमावलं. महिलांसोबत गंभीर अपराध झाले. हे अपराद अक्षम्य असे आहेत. दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून भरपूर प्रयत्न करत आहे.
शांतीचा सूर्य नक्की उगवेल
मी देशाच्या सर्व नागरिकांना आश्वासित करु इच्छितो, ज्याप्रकारे प्रयत्न सुरू आहेत त्यानुसार आगामी काळात मणिपूरात शांतीचा सूर्य नक्कीच उगवेल. नव्या आत्मविश्वासाने पुढे जाईल. मी मणिपूरच्या लोकांना, तिथल्या माता, बघिणी आणि मुलींना सांगू इच्छितो देश तुमच्यासोबत आहे. हे सदन तुमच्यासोबत आहे. आम्ही सर्व मिळून या आव्हानावर मार्ग काढू. तिथे पुन्हा शांततेची स्थापना होईल. मी मणिपूरच्या लोकांना विश्वास देतो की, मणिपूर पुन्हा विकासाच्या मार्गाने पुढे जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App