ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये पंतप्रधान मोदींचं विधान
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी शुक्रवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2024 मध्ये हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमात उपस्थित लोकांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारतात सध्या सणासुदीचा हंगाम आहे, आम्ही नुकतीच जन्माष्टमी साजरी केली आणि आनंद बघा, आमच्या अर्थव्यवस्थेत आणि बाजारपेठेतही उत्सवाचे वातावरण आहे. या सणाच्या मूडमध्ये हा ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल होत आहे आणि तोही मुंबई शहरात स्वप्नासारखे आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, विमानतळांपासून ते खाद्यपदार्थ आणि खरेदीच्या अनुभवांपर्यंत, भारताची फिनटेक क्रांती सर्वत्र दिसून येत आहे. गेल्या 10 वर्षांत फिनटेक स्पेसमध्ये 31 डॉलर अब्जाहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. आमच्या फिनटेक स्टार्टअप्सनी दहा वर्षांत 500 टक्के वाढ केली आहे, स्वस्त मोबाईल फोन, स्वस्त डेटा आणि शून्य शिल्लक जन धन खात्यांनी भारतात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
मोदी पुढे म्हणाले की, अवघ्या एका दशकात ब्रॉडबँड वापरकर्त्यांची संख्या ६ कोटींवरून ९४ कोटी झाली आहे. आज १८ वर्षांवरील क्वचितच कोणी भारतीय असेल ज्याच्याकडे त्याचे डिजिटल ओळखपत्र नाही. आज ५३० दशलक्ष (53 कोटी) लोकांकडे जन धन खाती आहेत. याचा अर्थ असा की दहा वर्षांत आम्ही संपूर्ण युरोपियन लोकसंख्येइतकेच लोक बँकिंग प्रणालीशी जोडले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App