पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या लाओसच्या दौऱ्यावर आहेत
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : समाजवादी दिग्गज आणि आणीबाणीविरोधी चळवळीचे प्रतीक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न पुरस्कार प्राप्त विचारवंत नानाजी देशमुख यांची आज जयंती आहे. यावेळी पंतप्रधानांनी दोन्ही दिग्गज नेत्यांचे स्मरण केले. यासोबतच पंतप्रधान मोदींनी दोन्ही महान व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या लाओसच्या दौऱ्यावर आहेत. जिथे त्यांनी गुरुवारी २१व्या आसियान परिषदेला हजेरी लावली. आपल्या व्यस्त वेळापत्रकात, पंतप्रधान मोदींनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे स्मरण केले आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
महायुती सरकारचे विक्रमी 80 निर्णय; नॉन क्रिमिलेयरची मर्यादा 8 वरून 15 लाख, पत्रकारांसाठी महामंडळाची घोषणा
मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली. ज्यात त्यांनी लिहिले आहे की, “लोकनायक जयप्रकाश नारायण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त माझी विनम्र श्रद्धांजली. त्यांनी आपले जीवन देश आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी समर्पित केले. त्यांचे व्यक्तिमत्व आणि आदर्श प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्त्रोत राहतील.”
यासोबतच पंतप्रधान मोदींनी नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. मोदींनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारतरत्न नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त देशवासियांकडून विनम्र श्रद्धांजली. देशातील ग्रामस्थांच्या, विशेषत: वंचित समाजाच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे समर्पण आणि सेवाभावना सदैव स्मरणात राहील. ”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App